कुख्यात गुंड राजेश भारती स्थानबद्ध

08 May 2025 17:55:19
गोंदिया,
gangster Rajesh Bharti विविध गुन्हयाची नोंद असलेल्या कुख्यात गुंड राजेश उर्फ राजा सुदर्शन भारती (42) रा. देवरी याच्यावर एम. पी. डी. ए. अंतर्गत कारवाई करून एका वर्षासाठी त्याची अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई 7 मे रोजी जिल्हा दंडाधिकारी प्रजित नायर यांनी जारी केलेल्या आदेशान्वये करण्यात आली.
 

राजेश भारती 
 
आरोपी राजेश भारतीवर देवरी पोलिस ठाणे येथे विविध प्रकारचे 16 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. राजेश हा त्याच्या गुंड साथीदारांसह रात्री-अपरात्री घातक हत्यारे घेवुन कामगार, व्यवसायिक, नागरिकांना हत्याराचा धाक दाखवुन दहशत माजवुन, मारहाण करून लुटण्याचे काम करीतो. या प्रकारामुळे नागरीकांत भिती असून दैनंदिन कामकाज करणे त्यांना जिकरीचे झाले आहे. काही तरुणांना सोबत घेवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनवुन त्यांचेकडून बेकायदेशीर कृत्ये करवून घेण्याचा त्याचा हेतु असून त्याच्या या कृत्यामुळे जनतेला धोका निर्माण झाला होता. अधिकारी, कर्मचारी यांना दैनंदिन काम करणे अवघड झाले होते. त्याने देवरी परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याचेवर गुन्हे नोंद तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही. त्याने प्रतिबंधक कारवाईचा भंग केला. त्याच्यात कायद्याची भिती नसल्याचे दिसुन आल्याने कलम 3 (1) महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती, अवैध वाळु तस्करी करणारे तसेच अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणार्‍या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत असलेल्या अधिनियमानुसार जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडे राजेशच्या स्थानबध्दतेचा प्रस्ताव पाठविण्यात आला. प्रस्तावाला नायर यांनी बुधवारी मान्यता दिली.gangster Rajesh Bharti आदेशान्वये राजेशची अमरावती जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात देवरीचे पोलिस निरिक्षक प्रवीण डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात अंमलदार देवचंद सोनटक्के, महिला पोलिस शिपाई निता कांबळे, प्रतिबंधक सेलच्या पोलिस उपनिरिक्षक वनिता सायकर, अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांनी केली.
Powered By Sangraha 9.0