उद्या श्रध्दांजली सभेचे आयोजन

09 May 2025 21:00:34
नागपूर,
Ramdas Ambatkar : भाजपचे माजी आमदार आणि संघटन मंत्री रामदास आंबटकर यांचे ३० एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल, भारतीय जनता पार्टी विदर्भ विभागातर्फे शनिवार, १० मे रोजी सायंकाळी वा. दक्षिण अंबाझरी रोड, दीक्षाभूमीजवळील बी.आर. मुंडले सभागृह येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रा.स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहतील.
 
 

ramdas-ambatkar 
Powered By Sangraha 9.0