VIDEO: राजस्थानमधील बाडमेर आणि जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ला!

09 May 2025 21:24:54
नवी दिल्ली,
Operation Sindoor : भारत आणि त्याचा आक्रमक शेजारी पाकिस्तान यांच्यात युद्धाच्या भीतीमुळे राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांतील बारमेर आणि जैसलमेरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. आज दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ड्रोन हालचाली दिसून आल्या. बाडमेरच्या आकाशात विमाने आणि ड्रोन सारख्या गोष्टी दिसल्या आहेत. शहरात पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सायरनसह मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. येथे पोलिसांची हालचालही वाढली आहे. संपूर्ण शहरात आधीच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 

rajsthan
 
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना घरीच राहण्याचे निर्देश दिले
 
बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांनी अलर्ट जारी केला आहे आणि सर्व लोकांना तात्काळ त्यांच्या घरात जाण्याचे निर्देश दिले आहेत. राजस्थानमधील लष्करी तळांना पाकिस्तानने सलग दोन दिवस लक्ष्य केले आहे. तथापि, भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच पाडले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0