राष्ट्रीय महामार्गावर मॅफेड्रानसह दोघांना अटक

09 May 2025 20:29:21
हिंगणघाट, 
Mephedrone : शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने मॅफेड्रान या अंमली पदार्थांची विक्री करताना दोघांना ६.५५ ग्राम एमडीसह अटक केली.
 
 
 
jlkj
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ८ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल आळंदे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्तीवर होते. दरम्यान शहरात एमडी या अंमली पदार्थाची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील मोठा मारोती देवस्थानाजवळ नाकेबंदी करून दुचाकीवर जाम येथून सर्विस रोडने येताना दोन इसम आढळले.
 
दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता निखिल भोकरे (२०) व त्याचा मित्र आकाश उर्फ लल्ला शिंदे (३४) दोन्ही रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट अशी नावे सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता दुचाकी चालक निखिल भोकरे याच्या खिशात एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये १८ हजार ३९० रुपये किमतीचे ६.५५ ग्रॅम मॅफेड्रान अंमली पदार्थ मिळाला. पोलिसांनी अंमली पदार्थ, दुचाकी असा १ लाख ८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवरही गुन्हा नोंद केला.
 
 
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, सायबर शाखा वर्धा येथील अनुप कावळे, गोविंद मुंडे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0