कोराडीत विजय ग्रंथाचे महापरायण

    दिनांक :01-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Koradi श्री संत गजानन महाराज सेवा समिती संघाच्या तीन खंबा चौक नागपूरच्या वतीने दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायण रविवारी कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात उत्साहात झाले. सकाळी महालक्ष्मी जगदंबा मातेचा अभिषेक व श्री संत गजानन महाराज यांच्या पूजेसह उपस्थित भाविकांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले. दुपारी बारा वाजता महाआरती होऊन महापारायणाची सांगता झाली. यानिमित्त आयोजित सत्संगात दास अनुपकुमार गुप्ता यांनी भक्तांना श्री सद््गुरू गजानन महाराजांच्या लीला प्रकरणावर प्रकाश टाकला.
 

Mahaparayana of Vijay Granth in Koradi