जगप्रसिद्ध गायिका रिहानावर दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन

वयाच्या ७०व्या वर्षी अखेरचा श्वास

    दिनांक :01-Jun-2025
Total Views |
Rihanna father death हॉलिवूडसह संपूर्ण जगभरात आपल्या गायनकौशल्याने विशेष ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध सिंगर रिहाना सध्या शोकाकुल अवस्थेत आहे. रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचं निधन झालं असून, त्यांनी वयाच्या ७०व्या वर्षी लॉस अॅंजेलिस येथे शनिवारी (३१ मे) सकाळी अखेरचा श्वास घेतला.
 

 Rihanna father death 
त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी रिहानाचा भाऊ राजद फेंटी यांनी रोनाल्ड यांची भेट घेतली होती. त्यांनी लॉस अॅंजेलिसमधील सीडर-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये जाऊन वडिलांची विचारपूस केली होती.
 
 
रोनाल्ड Rihanna father death फेंटी यांच्या निधनावर सध्या तरी रिहानाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, रिहाना आणि तिच्या वडिलांमधील नातेसंबंध गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण होते. २०१९ मध्ये रिहानाने आपल्या वडिलांविरुद्ध परवानगीशिवाय 'फेंटी एंटरटेनमेंट' कंपनीचं नाव वापरल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली होती.
 
 
दरम्यान, बारबाडोसच्या पंतप्रधान मिया मोटली यांनी रोनाल्ड फेंटी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "ही एक अत्यंत दुःखद बातमी आहे. बारबाडोस सरकार आणि जनतेतर्फे मी रिहाना फेंटी यांना आणि त्यांच्या परिवाराला संवेदना व्यक्त करतो. रिहानाच्या व्यक्तिमत्त्वाला घडवण्यात रोनाल्ड यांचा मोठा वाटा होता. त्यांनी अनेक लोकांना प्रेरित केलं आहे," असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.रिहानाच्या चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.