आई...माझे पाय दुखत आहेत ...परत चल ना...

01 Jun 2025 10:51:03
नागपूर, 
Sunita Jamgade ‘‘ आई .. माझे पाय दुखत आहे... मला खूप भूक पण लागली...परत चल ना... मला आता चालणे पण हाेणार नाही..’ असी विनवणी सुनीता जामगडे हिचा 12 वर्षीय मुलगा करीत हाेता. मात्र, सुनीताने त्याला ‘तुला काही तरी खायला आणते, तू येथेच थांब’ असे बाेलली आणि पाकिस्तानात निघून गेली. अशी माहिती सुनीताच्या मुलाने कपिलनगर पाेलिसांना दिली.
 
हेही वाचा: अरे देवा...मोबाईलच्या नादात टेप कापण्याऐवजी तिने कापले बाळाचे बोट 
 
Sunita Jamgade
 
नागपूरच्या सुनीता जामगडे (वय 43) या महिलेने नियंत्रण रेषा (एलओसी) पार करून पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले. ती पाकिस्तानच्या ताब्यात 9 दिवस हाेती. त्यानंतर तिला भारताच्या स्वाधीन केले हाेते. सुनीता ही इंस्टाग्रामवरुन पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या संपर्कात आली. ताे अंगठ्यांमध्ये बसविण्यात येणाऱ्या खड्यांचा (क्रिस्टल स्टाेन्स) व्यवसाय करताे. कारगिलजवळील हुंदरमन गावातून एलओसी पार करून ती पाकिस्तानात गेली हाेती. गिलगिट शहरातील झुल्ीकार नावाच्या युवकाला ती भेटायला जाणार हाेती, असा दावा सुनीताने पाेलिसांच्या चाैकशीत केला. सुनीताचा मुलाची पाेलिसांनी चाैकशी केली. त्याला विश्वासात घेऊन विचारणा करण्यात आली. Sunita Jamgade ताे म्हणाला की, आईसाेबत मी बराच पायी चाललाे. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर माझे दुखत हाेते. म्हणून मी आईला म्हणालाे की, आता माझ्याकडून चालणे हाेणार नाही. मला भूक लागली आहे. त्यानंतर आईने खायला काहीतरी घेऊन येते, असे म्हणून मला तेथेच साेडून समाेर निघून गेली. मी तेथे वाट बघत बसलाे. शेवटी सायंकाळपर्यंत वाट बघितल्यानंतर माझी काही लाेकांनी विचारपूस केली. त्यानंतर मला पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती मुलाने पाेलिसांना दिली.
 
सुनीता सध्या कपिलनगर पाेलीस ठाण्यात काेठडीत आहे. तिची राेज चाैकशी करण्यात येत आहे. Sunita Jamgade मात्र, ती पाेलिसांना चाैकशीत सहकार्य करीत नसल्याची माहिती समाेर आली आहे. साेमवारी सुनीताची पाेलिस काेठडी संपणार असून तिला न्यायालयात हजर करण्यात येईल. तिची पुन्हा पाेलिस काेठडी घेण्यात येणार असल्याची माहिती पाेलिस सूत्रांनी दिली.
Powered By Sangraha 9.0