नागपूर,
Theater movement in Halba community हलबा समाजात नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी व नाट्य कलावंतांना रंगमंच ऊपलब्ध करून देण्यासाठी आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान द्वारा बेसा व वैशाली नगर येथे आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिर व सी पी एंड बेरार तुळशीबाग येथे आयोजित नाट्य संमेलनास आर्थिक मदतीचा हात म्हणून आदिम यूथ फांऊडेशन तर्फे रूपये अकरा हजाराचा मदतनिधी आदिम रंगभूमीचे संस्थापक, तरूण रंगकर्मी, आकाश पौनीकर यांना देण्यात आला.
सी.पी.एंड बेरार महाविद्यालय तुळशीबाग येथे आयोजित या शिबिराच्या समापन कार्यक्रमात फाऊंडेशनचे सचिव ओमप्रकाश पाठराबे,कोषाध्यक्ष विनायक वाघ,Theater movement in Halba community सदस्य गण धनराज पखाले व प्राध्यापक डाॅ राजकुमार खापेकर सहित समाजातील नाट्य रसिक व गणमान्य नागरिक ऊपस्थित होते.
सौजन्य: श्रीकांत पवनीकर ,संपर्क मित्र