जनतेचा आवाज; चौकाने घेतला मोकळा श्वास

    दिनांक :10-Jun-2025
Total Views |
वर्धा,
Wardha Encroachment वर्धेतील सर्वच चौक अतिक्रमण युक्त आहेत. आर्वी नाका चा तर जीव गुदमरत होता. अपघाताची अशक्यता बाळवली होती. काल रात्री येथील वकील अनंत साळवे यांनी समाज माद्यमातून सोमवारी रात्री आर्वी नाका परिसरातील राष्ट्र संत तुकडोजी महाराज पुतळ्यावरील फ्लेक्स न काढल्यास मंगळवारी सकाळी आपण स्वतः फ्लेस काढू अशी पोस्ट टाकली आणि आज सकाळी ९ च्या आधी पुतळ्याला लागलेले फ्लेक्स नगर पालिकेने काढून टाकले.
 
 
encrochment
 
 
आज पहाटे नगर परिषद प्रशासनाने आर्वी नाका चौकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाला वेढलेले सगळे बॅनर काढून टाकले. याकरिता नगर परिषद प्रशासन अभिनंदनास पात्र आहेत.Wardha Encroachment मला व्हॉट्सअँप, फोन आणि वैयक्तिकरीत्या साथ देणाऱ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार असल्याची पोस्ट साळवे यांनी पुन्हा समाज मध्यमावर टाकली