भौतिकशास्त्र विभागातील एमएसस्सी १२ विद्यार्थ्यांच्या १६ पेटंटला मान्यता

11 Jun 2025 14:06:11
नागपूर,
Dr. Sanjay Dhoble राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील एमएस्सीच्या १२ विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकूण १६ पेटंट येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनात प्राप्त केले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच विभागातील एमएस्सीच्या विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करण्यासाठी उत्साहित करून व त्यांच्याकडून पेटंटचे कार्य करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविण्यात डॉ. संजय ढोबळे यांना यश आले आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी पुढे संशोधन क्षेत्राकडे आपले ध्यान केंद्रित करून कार्य करीत आहे.
 

ढोबळे  
 
 
डॉ. संजय ढोबळे हे नेहमीच सामाजिक समस्या, विज्ञानाशी संबंधित विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. यावर्षी त्यांनी एमएस्सी प्रथम वर्ष सेमिस्टर २ मधील मरसीयाना सिल्वेस्टर, ओम देऊळकर, कल्याणी निंबाळकर, सुमितकुमार पांडे, प्राची सारवे, खूशबु सिंग तर एमएस्सी द्वितीय वर्ष सेमिस्टर ४ मधील सिद्धेश्वर नागपुरे, मुकेश तुरकाने, प्रांजली झाडे, आदिती देशमुख, वेदांत कामडी, प्रियंका चरडे अशा एकूण १२ विद्यार्थ्यांकडून १६ पेटंटला मान्यता मिळवून घेतली आहे. विद्यार्थ्यांसोबत संशोधन कार्य करून त्यांना योग्य संशोधनाची दिशा दाखवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचा प्रयत्न करीत आहे.Dr. Sanjay Dhoble यातून वरील १२ एमएस्सी भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांकडून १६ पेटंट आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाले आहे. विभागातील विद्यार्थ्यांनी डॉ. संजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनात उत्तुंग कार्य केल्याने प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांच्यासह सर्व संशोधकांनी विद्यार्थ्यांचे व डॉ. संजय ढोबळे यांचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0