मूर्ख लोकांना कधीच हलक्यात घेऊ नये

कंगना राणौत सोनमवर भडकली

    दिनांक :11-Jun-2025
Total Views |
इंदूर,
Kangana Ranaut इंदूरमधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या जोडप्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. पती राजा रघुवंशीच्या खूनप्रकरणी पत्नी सोनमने अखेर आत्मसमर्पण केलं असून, या प्रकरणात धक्कादायक तपशील समोर येत आहेत.
 
 

Kangana Ranaut  
सोनमचा Kangana Ranaut  वडिलांच्या कारखान्यात काम करणाऱ्या राज कुशवाह या तरुणाशी प्रेमसंबंध होता. ती राजा रघुवंशीसोबत लग्न करण्यास इच्छुक नव्हती. मात्र कुटुंबाच्या दबावाखाली तिने लग्न केलं आणि अवघ्या तीन दिवसांत पतीच्या हत्येची योजना आखली. राज कुशवाहसह आणखी दोघांना तिने सुपारी दिली होती.या घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत हिनेही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिने संताप व्यक्त केला असून सोनमला ‘मूर्ख’ ठरवलं आहे.
 
 
कंगनाने लिहिलं आहे की, "हा किती बिनडोकपणा आहे. स्वत:च्याच पालकांच्या भीतीमुळे एक महिला लग्नाला नकार देऊ शकत नाही, पण ती सुपारी किलर्ससोबत मिळून पतीच्या हत्येचं प्लॅनिंग करू शकते. सकाळपासून ही गोष्ट माझ्या डोक्यात आहे, पण मला काहीच समजत नाहीये. उफ्फ... आता माझं डोकं दुखायला लागलंय. ती घटस्फोट देऊ शकत नव्हती का? प्रियकरासोबत पळून जाऊ शकत नव्हती का? हे सर्व किती क्रूर, भयंकर आणि मूर्खपणाचं आहे!"
 
 
तिने पुढे लिहिलं आहे की, "मूर्ख लोकांना कधीच हलक्यात घेऊ नये. कोणत्याही समाजासाठी त्यांचाच सर्वात मोठा धोका असतो. आपण अनेकदा त्यांच्यावर हसतो आणि ते कोणालाच काही करू शकत नाही असा विचार करतो. पण हे खरं नाही. एकवेळ शहाणी माणसं स्वत:च्या भल्यासाठी दुसऱ्यांचं नुकसान करतील. पण मूर्ख माणसाला ते काय करतायत हेच कळत नाही. तुमच्या आजूबाजूला असलेल्या मूर्खपणाबद्दल जागरुक, खूप जागरुक राहा."
 
 
दरम्यान, Kangana Ranaut  सोनमने लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पती राजाची हत्या करण्याचा कट रचला होता, हे राज कुशवाहसोबतच्या चॅट्समधून उघड झालं आहे. लग्नानंतर राजा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिने चॅटमध्ये नमूद केलं होतं आणि ते तिला अजिबात आवडत नव्हतं.सध्या सोनमने गाझीपूर येथे उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून, पुढील तपासासाठी मेघालय पोलीस तिला शिलाँग येथे नेत आहेत. या प्रकरणाचा तपास आता अधिक गतीने सुरू आहे.