सी.पी.एंड बेरार तुळशीबाग येथे आयोजित नाट्य संमेलन

11 Jun 2025 19:08:02
नागपूर,
CP& Berar College हलबा समाजात नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी व नाट्य कलावंतांना रंगमंच ऊपलब्ध करून देण्यासाठी आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान द्वारा बेसा व वैशाली नगर येथे आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिर व सी.पी.एंड बेरार तुळशीबाग येथे आयोजित नाट्य संमेलनास आर्थिक मदतीचा हात म्हणून आदिम यूथ फांऊडेशनतर्फे रूपये अकरा हजाराचा मदतनीधी आदिम रंगभूमीचे संस्थापक तरूण रंगकर्मी आकाश पौनीकर यांना देण्यात आला.
 
 
C.P. & Berar Tulshibagh
 
सी.पी.एंड बेरार महाविद्यालय तुळशीबाग येथे आयोजित या शिबिराच्या समापन कार्यक्रमात फाऊंडेशन चे सचिव ओमप्रकाश पाठराबे, कोषाध्यक्ष विनायक वाघ, CP& Berar College सदस्यगण सर्वश्री धनराजजी पखाले व प्राध्यापक डाॅ.राजकुमार खापेकर सहित समाजातील नाट्य रसिक व गणमान्य नागरिक ऊपस्थित होते.
सौजन्य: श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0