नागपूर,
CP& Berar College हलबा समाजात नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी व नाट्य कलावंतांना रंगमंच ऊपलब्ध करून देण्यासाठी आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान द्वारा बेसा व वैशाली नगर येथे आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिर व सी.पी.एंड बेरार तुळशीबाग येथे आयोजित नाट्य संमेलनास आर्थिक मदतीचा हात म्हणून आदिम यूथ फांऊडेशनतर्फे रूपये अकरा हजाराचा मदतनीधी आदिम रंगभूमीचे संस्थापक तरूण रंगकर्मी आकाश पौनीकर यांना देण्यात आला.
सी.पी.एंड बेरार महाविद्यालय तुळशीबाग येथे आयोजित या शिबिराच्या समापन कार्यक्रमात फाऊंडेशन चे सचिव ओमप्रकाश पाठराबे, कोषाध्यक्ष विनायक वाघ, CP& Berar College सदस्यगण सर्वश्री धनराजजी पखाले व प्राध्यापक डाॅ.राजकुमार खापेकर सहित समाजातील नाट्य रसिक व गणमान्य नागरिक ऊपस्थित होते.
सौजन्य: श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र