प्रहार जनशक्ती पक्षाचे साखळी उपोषण

11 Jun 2025 13:00:00
वणी,
Prahar Janshakti Party प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, 9 जूनपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू झाले आहे.
 

Prahar Janshakti Party,yavatmal  
 
 
उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च एमआरइजीएस मधून करण्यात यावा, दिव्यांग बांधवांना 6 हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे, मनरेगामधली मजुरी 500 रुपये करण्यात यावी, शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणात प्रहारचे उपजिल्हा प्रमुख मुबिन शेख, तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे, तालुकाप्रमुख रघुवीर कारेकर, तालुका सचिव मुन्ना येरेकर, शहरप्रमुख प्रहार वाहन चालक संघटन सचिन राखुंडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0