सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येवरील माहितीपट प्रदर्शित

11 Jun 2025 15:20:02
पंजाब,
Sidhu Moosewala पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येवर आधारित माहितीपट बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसकडून बुधवारी (११ जून) प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, हीच सिद्धू मूसेवालाची जयंतीदेखील होती. या दिवशीच बीबीसीने दोन भागांमध्ये हा माहितीपट आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केला.
 
 

Sidhu Moosewala documentary 
या माहितीपटाच्या प्रदर्शनावर गायकाचे वडील बलकौर सिंग यांनी आक्षेप घेतला असून, त्यांनी मानसा न्यायालयात माहितीपटावर बंदी घालण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे बलकौर सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर,मुंबईतील सिनेमा हॉलमध्ये माहितीपट दाखवण्याचा कार्यक्रम आखला होता. परंतु वाद उफाळल्याने हा माहितीपट अखेर यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.
बलकौर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, माहितीपट त्यांच्या संमतीशिवाय तयार करण्यात आला असून, त्यात त्यांच्या मुलाच्या हत्येबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हा माहितीपट सिद्धू मूसेवालाच्या स्मृती आणि वारशाला कलंकित करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक (DGP) आणि मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यातही यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, ११ जून रोजी दुपारी ३ वाजता जुहूतील एका ठिकाणी माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.दरम्यान, सिद्धू मूसेवालाच्या वाढदिवसानिमित्त त्याची तीन नवीन गाणीही अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आली आहेत. चाहत्यांनी या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.
Powered By Sangraha 9.0