परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती!

12 Jun 2025 17:29:00
नागपूर,
Scholarships-Higher Education-Abroad : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला- मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला- मुलींकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे.
 
 
 
ngp
 
 
 
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतात, अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्याबाबतचे निकष उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. ३१ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून दिनांक ४ ऑक्टोंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या सर्व शाखांमधील पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या १० वरून ३० व पीएचडी करिता १० विद्यार्थी अशा एकूण ४० विद्यार्थ्यांची शाखा निहाय विभागणी करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात ४० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. त्याकरिता सदर शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया संचालनालयाच्या https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून सुरू करण्यात आलेली आहे.
 
 
 
दिनांक ६ ऑगस्ट २०२४ नुसार या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेली पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी तसेच पीएचडी अभ्यासक्रमासाठी असलेली गुणांची अट ६० टक्के भरून शिथिल करून ५५ टक्के करण्यात आली आहे. उमेदवार व उमेदवाराची आई-वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असावेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अध्यायावत सन २०२५ मधील क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक आहे. उमेदवाराच्या पालकाचे, कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे आर्थिक वर्षातील २०१४-२५ मधील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्यपद्धती इत्यादी माहिती तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत मूळ प्रमाणपत्र कागदपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रतींसह पडताळणीसाठी संबंधित सहसंचालक विभागीय कार्यालयात २७ जून २०२५ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सादर करावयाची आहे.
Powered By Sangraha 9.0