‘ते’ रत मानवी, अहवालात स्पष्ट

12 Jun 2025 20:00:35
वर्धा, 
Kartik missing case : तळेगाव वनपरिक्षेत्रात येणार्‍या जंगलव्याप्त भागातील मांडला या गावाच्या शेजारी झोपड्यात वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील तीन वर्षीय कार्तिक १२ मार्चला बेपत्ता झाला. त्याच्या शोधार्थ आर्वी पोलिस तसेच तळेगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी जंगल पिंजून काढला. अद्याप कार्तिकचा सुगावा लागला नसला तरी १४ मार्चला जंगलातच रत आढळले होते. हे रत मानवी असल्याचा अहवाल आर्वी पोलिसांना मिळाला आहे.
 
 
kartik
 
आर्वी पोलिस व तळेगावच्या वनविभागाने बुधवार ११ रोजी संयुत शोध मोहीम पुन्हा राबविली. याच माहिमेदरम्यान काही हाडं मिळाली. ही हाडे मानवी आहे काय, याची माहिती जाणून घेण्यासाठी हाडांचे नमुने विश्लेषणासाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली. तीन महिन्यानंतर नागपूर येथील प्रयोगशाळेतून अहवाल मिळाल्यावर जंगलातील ते रत मानवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण संबंधित रत १२ मार्च पासून बेपत्ता असलेल्या कार्तिकचेच काय हे डीएनए अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. रत मानवी असल्याचा अहवाल आर्वी पोलिसांना मिळाला असला तरी डीएनए अहवालाची प्रतीक्षा अजूनही आर्वी पोलिसांना आहे.
 
 
पीडित कुटुंबाने सोडले मांडला
 
 
मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या एअर सिंग रुमसिंग चंगल यांचा ३ वर्षीय मुलगा कार्तिक बेपत्ता झाला. आर्वी पोलिस व वनविभागाच्या वतीने जंगलात शोध मोहीम राबविण्यात आली. पण अद्यापही कार्तिक गवसलेला नाही. विशेष म्हणजे, मध्यंतरी कार्तिकच्या कुटुंबियांनी मांडला हे गाव सोडले आहे. मांडला येथे वास्तव्यास असताना कार्तिकचे कुटुंबीय हंगामी वनमजूर व मिळेल ते रोजमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करायचे. सध्या ते नेमके कुठे आहेत याबाबतची माहिती ना पोलिस ना वनविभागाकडे आहे.
 
 
डीएनएसाठी आई-वडिलांच्या रताचे पाठविले नमुने
 
 
जंगल परिसरात रत आढळल्यावर संबंधित रत मिश्रीत माती व दगडाचे नमुने घेत ते विश्लेषणासाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शिवाय याच काळात कार्तिकच्या आई-वडिलांच्या रताचे नमुने घेत ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. पण अद्यापही डीएनएचा अहवाल आर्वी पोलिसांना मिळालेला नाही.
Powered By Sangraha 9.0