आनंदाची वार्ता! वारकऱ्यांसाठी दिलासा

14 Jun 2025 17:27:45
पंढरपूर,
Ashadhi Wari 2025 पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या ६ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी वारीसाठी राज्य सरकारने मानाच्या १० पालख्यांसह ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 
हेही वाचा: 'विमानात अजिबात आवाज नव्हता, यापूर्वी कधीही असे काही पाहिले नव्हते...', 
 

Pandharpur Ashadhi Ekadashi 
मागील Pandharpur Ashadhi Ekadashi  वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिंडींना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. यंदाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.वारीच्या तयारीत पंढरपूर सज्ज झाले असून वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुखी हरिनामाचा गजर, 'ज्ञानोबा-तुकाराम'चा जयघोष करत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0