अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसाठी सांकेतिक भाषेचा वापर!

युवक, युवती आणि विद्यार्थी नशेच्या आहारी?

    दिनांक :14-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Operation Thunder ऑपरेशन थंडरअंतर्गत अमली पदार्थ तस्करांची धरपकड मोहीम सुरू आहे. शहर पोलिसांनी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत 2 कोटींच्या वर मुद्देमाल जप्त केला असून, 320 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. मात्र, लपून-छपून खरेदी - विक्री आणि सेवन करणे सुरूच आहे. आजूबाजूला असलेल्या कुणाला शंका येऊ नये म्हणून आता सांकेतिक भाषेचा वापर केला जात आहे. जागतिक अमली पदार्थविरोधी दिनाच्या पृष्ठभूमीवर ऑपरेशन थंडर मोहिमेला गती मिळाली आहे.
 
 
 
 

Operation Thunder 

पालकांच्या त्यागाची मुलांनी कमत करावी
लिपस्टिक Operation Thunder आहे का? राख, लमची, लमा कवा ग्रीन टीसुद्धा चालेल. अशा अनेक सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. याशिवाय दर्जा आणि कुठला माल आहे, याविषयी विचारपूस करायची असल्यास रावस, सेवत, विशाखापट्टणम्‌‍ आणि ओडिशा या नावांचा वापर होतो. झेरॉक्स इंक, औषधी (खोकला) या ड्रग्सचे सेवन होत आहे.नागपुरात शिक्षण आणि रोजगाराच्या संधी भरपूर आहेत. भविष्यातील वेध लक्षात घेता परप्रांतीय आणि जिल्ह्याबाहेरील युवक-युवती शिक्षणासाठी येथे येतात. महाविद्यालयात प्रवेश मिळाला की तीन ते पाच वर्षे विद्यार्थ्यांचे परगावी वास्तव्य असते. मुलगा अभ्यास करीत आहे, असा पालकांना समज असतो. काही विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि जीवनात यशस्वी होतातही. परंतु काही भरकटतात. परंतु पाल्य खरेच शिक्षण घेतो आहे की, त्याचे पाऊल वाकडे पडत आहे, याची शहानिशा करणे पालकांचे कर्तव्य आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी वसतिगृहात तर काही भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांच्यावर निर्र्बंंध नसल्याने वागणुकीत बदल व्हायला लागतो. पानटपऱ्या, चहाटपऱ्या व अन्य ठिकाणी भोळ्याभाबड्या विद्यार्थ्यांना जाळ्यात अडकविण्यासाठी अमली पदार्थ विकणारे सक्रिय असतात. परिपक्वता आलेली नसल्याने विद्यार्थी जाळ्यात कधी अडकतात, समजतदेखील नाही. विद्यार्थ्यांना सवय लागावी म्हणून अमली पदार्थ विक्री करणारे प्रथम नि:शुल्क देतात. त्यानंतर पैशांनी खरेदी करावयास लावले जाते. सवय लागल्यानंतर अमली पदार्थासाठी विद्यार्थी मग कुठल्याही स्थरापर्यंत जातात. अनेक जण तर गुन्हेगारीकडेही वळतात. विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी अमली पदार्थांना हद्दपार करणे गरजेचे झाले आहे.
 
 
 
तरुणी नि:संकोचपणे जातात पानटपरीवर
 
 
सिगारेटचा Operation Thunder  धूर सोडणे आजकाल तरुणींसाठी नवे नाही. काही तरुणी नि:संकोचपणे पानटपरीवर जातात त्याच ठिकाणी धूर सोडतात, काही सोबत घेऊन जातात. सिगारेटमधील तंबाखू काढून त्यात अमली पदार्थ भरतात. एकदा सवय लागली की या व्यसनातून बाहेर निघणे जवळपास कठीणच जात असते. तरीही बहुतांश विद्यार्थी यातून बाहेर पडले आहेत. ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत.
 
 
 
 
धुराला आयुष्यातूनच हद्दपार करा
 
 
विद्यार्थ्यांच्या Operation Thunder  भविष्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नशामुक्त नागपूरची संकल्पना अमलात आणली आहे. त्यासाठी ऑपरेशन थंडर या नावाने मोहीम राबवीत आहे. याअंतर्गत आतापर्यंत 320 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दोन कोटी दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सततच्या कारवाईमुळे अमली पदार्थांची विक्री आणि खरेदीवर बरेच नियंत्रण मिळाले आहे. ही मोहीम पुढेही सुरू राहील. सांकेतिक भाषेचा वापर होत असेल तर त्या दिशेनेही कारवाई केली जाईल. या शांत शहराला अधिक सुंदर बनविण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. आयुष्याला धुरात उडविण्यापेक्षा धुराला आयुष्यातूनच हद्दपार करा. आई-वडिलांचा त्याग लक्षात ठेवा.
डॉ. रवींद्रकुमार सगल, पोलिस आयुक्त