वानाडोंगरी हिंगणा येथे आरोग्य शिबिर

14 Jun 2025 16:06:39
नागपूर,
Wanadongri Hingna Road अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूर व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क वैद्यकीय रक्त तपासणी इसीजी, व त्यासोबतच निशुल्क पंचकर्म, मसाज व शिरोधारा इत्यादी आयुर्वेदिक चिकित्सा कॅम्प श्री दत्ता मेघे आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी हिंगणा रोड येथे आयोजित करण्यात आलाहोता. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली.
 
 
 
 
pradhan
 
 कॅम्प यशस्वी करण्याकरिता अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवीदास आगरकर, मंडळाचे सचिव वसंतराव इझनकर, प्रतिष्ठानचे सचिव राजू मिश्राजी, डॉ. राखी खेडीकर, सर्फराज बोराडे सामाजिक कार्यकर्ता यांचे विशेष सहकार्य लाभले. कॅम्प यशस्वी करण्या करिता मंडळाचे सदस्य रामदास माहुरे,Wanadongri Hingna Road  अशोक सांबारे, तुकाराम शेंडे, विनोद हिरुळकर, मोहन धवल, . शोभा आगरकर,. शिला इझनकर यांनी अथक परिश्रम घेतले. श्री दत्ता मेघे आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटलचे उप प्राचार्य डॉ. मोहन राऊत, डॉ. विघ्नेश पिल्लाई, मिलिंद नाचणेकर, अश्विनी झाडे, प्रांजली बर्डे, पल्लवी अंबाडरे यांनी मोलाचे सहकार्य केले. कॅम्प मध्ये रासेकर, गणपतराव निंबाळकर, विलास वाकडे, रमेश जिल्हारे, रामकृष्ण बांगडे यांनी वैद्यकीय तपासणी शिबिरात भाग घेतला.
 
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0