QR कोड : तंत्रज्ञानाचा जलद प्रतिसाद

    दिनांक :14-Jun-2025
Total Views |
QR code आजच्या डिजिटल युगात माहिती मिळवण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशात QR कोड (Quick Response Code) हे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. तुम्ही एखाद्या उत्पादनावर, जाहिरातीत किंवा अगदी मोबाईल अॅपमध्ये QR कोड पाहिला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, हा कोड कसा काम करतो आणि त्याचा उपयोग काय आहे?
 
 

What is a QR code 
QR कोड म्हणजे काय?
QR कोड हा एक द्विमितीय बारकोड (2D Barcode) आहे, जो 1994 मध्ये जपानी कंपनी डेंसो वेव्ह ने तयार केला. हा कोड विविध प्रकारची माहिती डिजिटल स्वरूपात ठेवतो. याचा उपयोग वेगाने माहिती स्कॅन करून डिव्हाइसवर प्रदर्शित करण्यासाठी होतो.
QR कोडमध्ये काय असतं?
QR कोडमध्ये काळ्या आणि पांढऱ्या चौकटींच्या स्वरूपात माहिती एन्कोड (Encode) केलेली असते. यात वेबसाइट लिंक, टेक्स्ट, फोन नंबर, पेमेंट माहिती, स्थानिक माहिती यांसारखी कोणतीही माहिती असू शकते. या कोडमध्ये तीन कोपऱ्यांवर असलेल्या मोठ्या चौकटी (पॉझिशन मार्कर्स) मुळे स्कॅनरला कोडची दिशा समजते. तसेच कोडमध्ये काही विशिष्ट नमुने (पॅटर्न्स) असतात जे वाचनासाठी आवश्यक असतात.
QR कोड कसा वाचतो?
मोबाईल कॅमेरा किंवा स्कॅनर QR कोडवरून प्रकाश परावर्तित करून तो वाचतो. स्कॅनर कोडमधील काळ्या आणि पांढऱ्या ब्लॉक्स ओळखतो आणि त्यातून डिजिटल माहिती डिकोड करतो. नंतर ही माहिती वापरकर्त्याला स्क्रीनवर दाखवली जाते. उदाहरणार्थ, जर QR कोडमध्ये एखाद्या वेबसाईटची लिंक असेल, तर ती लिंक तुमच्या फोनमध्ये उघडते.
QR कोडचे फायदे
जलद माहिती मिळवणे : स्कॅन करताच लगेच माहिती मिळते.
सुलभता : टेक्स्ट टाकण्यापेक्षा QR कोड स्कॅन करणे अधिक सोपे.
विविधता : वेबसाइट लिंक, व्हॉट्सअॅप मेसेज, पेमेंट डिटेल्स, ईमेल, व्हिजिटिंग कार्ड अशा अनेक प्रकारच्या माहिती साठवू शकतो.
अधिक सुरक्षितता : QR कोडमधील माहिती चुकीच्या हातात पडली तरी ते वाचण्यासाठी स्कॅनर आवश्यक असतो.
QR कोडचा वापर कुठे होतो?
पेमेंट सिस्टीममध्ये : UPI, पेटीएमसारख्या डिजिटल पेमेंटमध्ये QR कोडचा मोठा उपयोग आहे.
प्रमोशनल ऑफर्स : जाहिरातींमध्ये QR कोड वापरून ग्राहकांना त्वरित ऑफर्स कळवता येतात.
शिक्षण व उद्योग : शैक्षणिक साहित्य, प्रॉडक्ट माहिती, कॅटलॉग यासाठी.
टिकिटिंग आणि प्रवेश नियंत्रण : इव्हेंट्स, मेट्रो, विमानतळ यावर QR कोड वापरले जातात.