वीज पडल्याने युवा शेतकर्‍यांचा मृत्यू

तुरखेड येथील घटना

    दिनांक :14-Jun-2025
Total Views |
अंजनगाव सुर्जी,
farmers die due to lightning तालुक्यातील तुरखेड येथे १४ जून रोजी शेतात पेरणी करीत असताना वीज कोसळल्याने युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील वादळी पावसाचा हा पहिला बळी आहे. अंजनगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर तुरखेड हे गाव असून येथील रहिवासी पवन दीपक कोल्हे (२५ ) व त्याची आई निर्मला कोल्हे (५१) शेतात मुजरा मार्फत सरकी व तुरीची पेरणी करत होते. अचानक पावसाच्या सरी कोसळल्यामुळे सर्व मजूर व पवन आडोसा शोधत होते. दरम्यानच जोरदार विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली. विजेच्या संपर्कात आलेल्या पवनला जोरदार विजेचा झटका बसला.
 
 
die
 
थोड्या अंतरावर असलेली त्याची आई निर्मला कोल्हे यांनाही विजेचा झटका बसला. दोघेही जागेवरच बेशुद्ध पडले. दरम्यान शेत गावालगत असल्याने ग्रामस्थ लगेच धावून आले. पवनची गंभीर परिस्थिती पाहून त्याला अकोट येथील दवाखान्यात नेण्यात आले. अकोट येथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. farmers die due to lightning तुरखेड हे गाव अंजनगाव सुर्जी तालुक्यातील असल्याने त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीस अंजनगाव सुर्जी येथे आणण्यात आला. अवघ्या पंचवीस वर्षाचा अविवाहीत पवन हा कुटुंबात मोठा होता. आई, वडील व भावांसह अवघ्या दीड एकर शेतीवर आपला उदरनिर्वाह करणार्‍या पवनच्या जाण्याने तुरखेड गावात शोककळा पसरली आहे.