सावधान...तुम्हाला ट्राफिक चालान भरण्याचा मॅसेज आला का?

14 Jun 2025 14:45:59
नागपूर,
E-challan scams जर तुमच्या माेबाईलवर वाहतूक विभागाचे नियमभंग केल्याचा मॅसेज आला असेल आणि ते भरण्यासाठी लिंक आली असल्यास सावधान. कारण राज्यभरात सायबर गुन्हेगारांच्या टाेळ्या सक्रिय झाल्या असून अनेकांच्या माेबाईलवर वाहतूक चालान पेंडिंग असल्याचे बनावट मॅसेज पाठवत आहेत. त्या मॅसेजमध्ये लिंक, एपीके फाईल आणि सायबर गुन्हेगारांचा माेबाईल क्रमांक देण्यात आला असून लिंकवर क्लिक करुन चालान भरल्यास सायबर गुन्हेगारांच्या खात्यात पैसे जमा हाेत आहेत. सायबर गुन्हेगार वाहतूक चालानचे मॅसेज पाठवून आर्थिक फसवणूक करीत असल्याच्या घटना समाेर येत आहेत.
 
 

cyber fraud fake traffic challan message 
सायबर E-challan scams गुन्हेगार सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवी शक्कल लढवित असतात. गेल्या काही महिन्यांपापासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सध्या राज्यात वाहतूक नियम माेडणाèयांची संख्या वाढली आहे. अनेकदा कळत-नकळत किंवा घाईत असताना वाहतूक नियम माेडल्या जातात. त्यामुळे चाैकातील सीसीटीव्ही कॅमेèयाच्या माध्यमातून माेबाईलवर वाहतूक नियम माेडल्यामुळे पाेलिसांकडून ई-चालान पाठविण्यात येते. ते चालान न भरल्यास वाहतूक पाेलिस चाैकात वाहन थांबवूून दंड वसूल करीत असतात. तसेच वाहनावर असलेले जुने चालानसुद्धा भरण्यास भाग पाडतात. सध्या राज्यात नियमभंग करणाèया वाहनचालकांवरील थकीत दंडाचे प्रमाण माेठे आहे. सायबर गुन्हेगारांनी नेमकी ही बाब हेरून आता वाहतूक नियमभंग केल्याचा बनावट मॅसेज तयार केला आहे. ताे मॅसेज अनेकांना पाठविण्यात येत आहे. ताे दंड भरण्यासाठी सायबर गुन्हेगार लिंक पाठवतात. या लिंकमध्ये सायबर गुन्हेगारांचा ‘क्युआर काेड’ आणि बँक खाते आणि एपीके फाईलसुद्धा पाठवलेली असते. ती फाईल डाऊनलाेड करण्यास सांगतात. त्यामाध्यमातून आर्थिक फसवणूक करतात.
 
 
 
.
एपीके फाईल डाऊनलाेड करु नका
 
 
वाहतूक E-challan scams पाेलिसांकडून येणारे चालानसंदर्भातील मॅसेज आणि सायबर गुन्हेगारांनी पाठवलेले मॅसेज अगदी हुबेहुब दिसतात. त्यामुळे सामान्य नागरिकांची गफलत हाेते. मॅसेजमध्ये एक एपीके फाईल असते. ती डाऊनलाेड केल्यास माेबाईलवरील नियंत्रण थेट सायबर गुन्हेगारांकडे जाते. दंड न भरल्यास वाहन जप्तीची कारवाई करण्याची भीती दाखवतात. त्यामुळे अनेक जण त्या मॅसेजला पाेलिसांकडून आलेला अधिकृत समजून ऑनलाईन दंड भरतात. मात्र, त्या दंडाची रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जमा हाेते.
सायबर गुन्हेगारांनी थकीत दंडाचा बनावट मॅसेज समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी बनावट मॅसेजला प्रतिसाद देऊ नये. कुणाची ऑनलाईन फसवणूक झाल्यास सायबर पाेलिस ठाण्यात लेखी तक्रार द्यावी.
- लाेहित मतानी, (पाेलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा)
 
 
‘थकीत दंडाचा अधिकृत मॅसेज वाहतूक पाेलिसांकडून पाठविण्यात येताे. त्यामध्ये काेणतीही एपीके ाईल पाठविल्या जात नाही. तसेच लिंकमध्ये वाहनाकडून नियमभंग झाल्याबाबत फोटाे पुरावा म्हणून जाेडलेला असताे. बनावट मॅसेजपासून वाहनधारकांनी सावध रहावे. चालानाबाबत खात्री करुनच दंड भरावा.’
- माधुरी बाविस्कर (प्र. पाेलिस उपायुक्त, वाहतूक शाखा)
Powered By Sangraha 9.0