शेलापूर शिवारात वीज पडून १७ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू

    दिनांक :15-Jun-2025
Total Views |
बुलढाणा,
Shelapur Shivara बुलढाणा जिल्ह्यात (१२ जून) सायंकाळी वादळी वार्‍यासह तीजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे शेलापूर शिवारात मोठी दुर्घटना घडली. अचानक वीज पडल्याने १७ पाळीव जनावरांचा जागीच मृत्यू झाला असून, स्थानिक मेंढपाळांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
 

17 goats and sheep die after being struck by lightning in Shelapur Shivara 
प्राप्त माहितीनुसार, मोताळा तालुयातील शेलापूर शिवारात सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळ सुरू असताना वादळी वार्‍यांबरोबर जोरदार वीज पडली. या दुर्घटनेत विविध मेंढपाळांच्या शेळ्या व मेंढ्या घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या. एकूण १७ जणावरे दगावली आहेत. यात ओंकार नारायण वाघ, निना नारायण वैतकार, ईश्वरदास भिकाजी बावस्कर, सुधाकर भिकाजी बोरसे यांच्या शेळ्या मेंढ्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने १३ जून रोजी सायंकाळी ७वाजता अधिकृतपणे दिली. संबंधित मेंढपाळांकडून पंचनामा प्रक्रिया सुरू असून, नुकसानभरपाईच्या प्रस्तावासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.