घरफोडी करणार्‍या आरोपीला अटक

1.35 लाखाचे दागिने जप्त

    दिनांक :15-Jun-2025
Total Views |
चंद्रपूर,
Bhadravati भद्रावती येथील तांडा परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख लंपास करणार्‍या आरोपीला भद्रावती पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोनु रामदास धारावत (40, रा. बरांज मोकासा तांडा, भद्रावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 

Bhadravati  
भद्रावती येथील Bhadravati  तांडा परिसरातील अजय विजय माडोत हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. 12 जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडुन आत प्रवेश केला व लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 36 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी सोनु धारावत यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरलेले 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली.
 
 
ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उप निरीक्षक गजानन तुपकर, सहायक फौजदार महेंद्र बेसरकर, हवालदार अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोळे आदींनी केली.