चंद्रपूर,
Chandrapur police पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका परप्रांतीय व्यक्तीचे अज्ञात आरोपीने मागून तोंड दाबून त्याच्या खिशातील 50 हजार रुपये हिसकावून नेले. ही घटना 12 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास येथील जलनगर वॉर्ड, सपना टॉकीज परिसरात घडली. रामनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तत्परतेने तपास करीत आरोपीला अवघ्या 24 तासात अटक केली.
शेख जुबेर शेख कादर (33, रा. रहेमतनगर, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. छतीसगड राज्यातील कांकेर येथे राहणार मधुराम तुलसींग कोल्हा (34) हा तामिळनाडू राज्यातून मजुरीचे काम करून 11 जूनला तिरपूर रेल्वे स्थानक येथून आपल्या स्वगावी जाण्यासाठी निघाला होता. 12 जूनला सकाळी 10 वाजताच्या सुमारास तो चंद्रपूर रेल्वे स्थानक येथे पोहचला. मधुरामच्या गावाकडे जाणारी Chandrapur police बस दुसर्या दिवशी सकाळी 5 वाजताची होती. या दरम्यान तो रात्री 8 वाजता चंद्रपूर येथील जलनगर वॉर्ड परिसरातील सपना टॉकीज जवळील एका दुकानातून पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी गेला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने मागून येत त्याचे तोंड दाबले व त्याच्या खिशातील 50 हजार रुपये हिसकावून पसार झाला. मधुरामने तात्काळ रामनगर पोलिस ठाणे गाठत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी कलम 309 (6) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत आरोपी शेख जुबेर शेख कादर यास अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली 30 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
ही Chandrapur police कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले व निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे आदींनी केली.