जिजाऊ माँसाहेब स्मृती यात्रेला सिंदखेडराजातून प्रारंभ

15 Jun 2025 16:59:22
बुलढाणा,
Jijau Maasaheb Smriti Yatra राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा येथून पाचाड (रायगड) पर्यंत काढण्यात येणार्‍या दोन दिवसीय ’स्मृती यात्रेला’ रविवारी (१५ जून) सकाळी भव्य प्रारंभ होणार आहे. ही यात्रा राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ९ वाजता सिंदखेडराजा राजवाड्यातून यात्रेला सुरूवात होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवाजी राजे जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मभूमीत अभिवादनानंतर यात्रा अहिल्यानगर येथे मुक्काम करणार आहे.
 
 

Jijau Maasaheb Smriti Yatra begins from Sindkhedraja today 
यात्रेचे Jijau Maasaheb Smriti Yatra  अंतिम टप्प्यात १७ जून रोजी सकाळी ११ वाजता पाचाड (रायगड) येथील माँसाहेबांच्या समाधीस्थळी पूजन, पवित्र जल व माती अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0