योजनेला सुरुवात... एसटी पास थेट शाळेत

एसटी महामंडळाची नवीन मोहीम

    दिनांक :15-Jun-2025
Total Views |
मुंबई,
Pratap Sarnaik शाळा आणि कॉलेजमधील लाखो विद्यार्थ्यांना एसटी बस पाससाठी आता एसटी आगारात रांगा लावण्याची गरज भासणार नाही. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या महत्त्वपूर्ण सूचनेनुसार आता विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास थेट शाळा किंवा महाविद्यालयातच मिळणार आहेत.
 
 
pratapsarnaik
 
 
 
येत्याPratap Sarnaik  १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, शासनाने विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवासात ६६.६६ टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे मासिक पाससाठी केवळ ३३.३३ टक्केच रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास दिले जातील.आतापर्यंत विद्यार्थ्यांना पाससाठी एसटी केंद्रांवर लांब रांगा लावाव्या लागत होत्या किंवा शाळांनी गट करून आगारात जावे लागत होते. आता हा त्रास टळणार आहे. एसटीचे कर्मचारी शाळा व महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार थेट शाळांमध्ये जाऊन पास वितरीत करतील. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाचणार आहे.१६ जूनपासून एसटी प्रशासन “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबवणार आहे. यासाठी आगार व्यवस्थापकांनी शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.