देशी कट्ट्यासह एकजण ताब्यात

15 Jun 2025 10:19:17
गोंदिया, 
Rawanwadi police पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे रावणवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका आरोपीला अग्नीशस्त्रासह (गावठी कट्टा) ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगरुटोला (लंबाटोला) ते पांजरा मार्गावर शनिवार १४ जून रोजी दुपारी १२.४८ वाजताच्या सुमारास करण्यात आली. राजु हिरालाल मेश्राम (४२) रा. मंगरुटोला (लंबाटोला) ता.जि. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
 
 
Rawanwadi police
 
रावणवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना तालुक्यातील मंगरुटोला (लंबाटोला) ते पांजरा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक व्यक्ती स्वत: जवळ पांढऱ्या पिशवित गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारे पोलिस पथकाने मंगरुटोला शिवारातुन मंगरुटोला ते पांजरा जाणाऱ्या कच्च्या रोडवर पाहणी केली असता आरोपी राजू मेश्राम हा पांढऱ्या रंगाची पिशवी घेवून फिरतानी मिळून आला. Rawanwadi police दरम्यान, पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष झळती घेतली. यावेळी त्याच्या जवळील पिशवीत एक लोखंडी पिस्तुल सारखा दिसणारा १५ हजार रुपये किमतीचा दोन ट्रिगर असलेला गावठी कट्टा, (अग्नीशस्त्र) मिळून आला. पोलिसांनी सदर गावठी कट्टा जप्त केला असून आरोपी राजू मेश्राम याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नावकार करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनात रावणवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक वैभव पवार, पोलिस उपनिरीक्षक पूजा जाधव, पोलिस हवालदार जगत बर्वे, गिरीष पांडे, पोलिस नायक सुशील मल्लेवार, पोलिस शिपाई बुराडे, लेकुरवाळे चालक पोलिस हवालदार खरबडे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0