काटा ते न्यू यॉर्क; सौरभची साता समुद्रापार पताका !

15 Jun 2025 16:35:22
वाशीम,
Saurabh Mantri वाशीम तालुक्यातील काटा गावातील रहिवासी सौरभ श्रीराम मंत्री यांनी अमेरिकेत मास्टर्स पदवी प्राप्त केली. त्याची ही शैक्षणिक वाटचाल म्हणजे सात समुद्रापार करून अमेरिकेत आपल्या गावासह देशाचे नावाची पताका फडकविली आहे.
 
 

Saurabh Mantri, Master of Accountancy New York, USA 
जिल्ह्यातील काटा या छोट्याशा गावातील सौरभ श्रीराम मंत्री यांनी अमेरिकेतील रायडर युनिव्हर्सिटी मधुन मास्टर ऑफ अकांऊटनसी इन अकाउंटिंग अँड बिझनेस अनालीटिक्स हि पदवी डिस्टिंक्शन होनोर्स श्रेणीसह प्राप्त केली आहे. सौरभ यांचे वडील श्रीराम मंत्री हे काटा गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. श्रीराम मंत्री यांनी आपले जीवन शेती आणि अध्यात्म यामध्येच खर्ची घातले.
शिक्षण हीच Saurabh Mantri मानवाची प्रगती आहे. या नीती मूल्यावर त्यांनी आपल्या मुलाचा शिक्षण प्रवास घडवला. शेतकरी कुटुंबातील मुलाने अमेरिकेत मास्टर्स पदवी मिळवणे ही संपूर्ण गावासाठी आणि जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या प्रवासात सौरभ यांनी आर्थिक अडचणी, सांस्कृतिक फरक आणि वैयक्तिक संघर्ष यांना सामोरे जात आई वडिलाचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वडिलांच्या कष्टांना, कुटुंबाच्या आधाराला डॉ. मारिया संचेज यांच्या मार्गदर्शनाला आणि मित्रपरिवाराला दिले आहे. सौरभ सध्या अमेरिकेत लेखा, करसल्ला व बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात कार्यरत असून, भविष्यात भारतातील तरुणांना आंतरराष्ट्रीय संधीं विषयी मोफत मार्गदर्शन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या वडिलांचे, त्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. ज्यांनी मला माझा संघर्षाचा काळात खंबीरपणे साथ दिली.
Powered By Sangraha 9.0