मी मुलं जन्म घालणारी मशीन नाही…

विद्या बालनचं धक्कादायक वक्तव्य

    दिनांक :15-Jun-2025
Total Views |
मुंबई,
Vidya Balan लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एकच प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे पुढची प्लॅनिंग काय? याच प्रश्नावर अभिनेत्री विद्या बालन हिने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तिच्या खासगी आयुष्याकडे पाहिलं तर, विद्या बालन हिने 2012 मध्ये निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत विवाह केला. सिद्धार्थ वयाने विद्यापेक्षा चार वर्षांनी मोठे आहेत.
 
 

Vidya Balan pregnancy statement 
एका जुन्या मुलाखतीत विद्या बालन हिने लग्नानंतर मुलाबाळाच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका मांडली होती. तेव्हा ती 30 वर्षांची होती. विद्या म्हणाली होती, "आता लोक माझ्यासोबत बोलताना आधी माझं पोट पाहतात. प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे मी त्रस्त झाली आहे. मी मुलं जन्माला घालेल, पण इतक्या लवकर नाही. आई होण्यासाठी मानसिक तयारी आवश्यक आहे. कोणाच्या तरी जबाबदारी घेणं सहज सोपं नाही."विद्या पुढे म्हणाली, "माझं वय 30 आहे, पण आई होण्याच्या वयाशी मला काही देणं-घेणं नाही. ही अशी अडचण आहे, जी प्रत्येक वर्किंग वूमनला भेडसावत असते. माझे मित्र सांगतात की, मुलांचं संगोपन म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे, पण त्यासाठी खूप ऊर्जा लागते. आणि दुसऱ्या कामांसाठी ती ऊर्जा उरत नाही. त्यामुळे मला थोडा वेळ द्या."
 
 
विद्या बालनने समाजातील एक महत्त्वाचा मुद्दा मांडत सांगितलं की, "लग्न झालं की लोक मोफत सल्ला देतात — बाळाला जन्म द्या. एक वेळ अशी आली होती की लोक मला दर महिन्याला प्रेग्नंट ठरवत होते. माझे फोटो काढले जायचे आणि विचारले जायचे, बेबी बंप आहे का? मी म्हणायची, नाही, हे माझं पोट आहे! लोकांनी लग्न आणि मुलाबाळाबद्दलच्या प्रश्नांची सरबत्ती थांबवली पाहिजे."सध्या विद्या बालन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपल्या विनोदी अंदाजातील व्हिडीओज आणि पोस्ट्समुळे कायम चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.