आईशी अश्लिल चाळे करणाऱ्या मिस्त्रीचा केला खून

16 Jun 2025 11:47:09
कुही, 
Nagpur news इमारतीच्या बांधकामावर कामावर असलेल्या महिलेशी अश्लिल कृत्य करणाऱ्या  मिस्त्रीचा आई व मित्राच्या मदतीने लाेखंडी सळाखीने हल्ला करुन खून केला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता कळमन्यात घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आराेपी मायलेकांना ताब्यात घेतले. सुमंतलाल म्हरसकाेल्हे (वय 45 वर्ष, रा. छपरा, जि. शिवनी, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बेबीबाई (38) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
 
 
Nagpur news
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबनराव सिताराम मगरदे ( वय 63 वर्ष, रा. कुकडे ले आउट, पार्वती नगर, अजनी, नागपूर) यांचे कळमना गावात घराचे बांधकाम सुरु आहे. तेथे सुमंतलाल म्हरसकाेल्हे हा मिस्त्री म्हणून काम करीत हाेता. गेल्या साेमवारी बेबीबाई ही महिला आपला 17 वर्षीय मुलगा आणि त्याचा मित्र असे तिघे जण बांधकामावर काम मागायला आली हाेती. बबनराव यांनी तिला कामावर ठेवले आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केली. बेबीबाई पतीपासून मुलासह विभक्त राहते. बांधकाम मिस्त्री सुमंतलाल याची वाईट नजर बेबीबाई हिच्यावर गेली. Nagpur news शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सुमंतलाल याने दारु ढाेसल्यानंतर बेबीबाईशी छेडखानी करीत शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार देऊन त्याला हाकलून दिले. तिने याबाबत कुणालाही काही न सांगितल्यामुळे दुसèया दिवशी सुमंतलालची हिम्मत वाढली. त्याने शनिवारी सकाळी तिच्याशी अश्लिल वर्तन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिचा मुलगा बाहेरुन मित्रासह तेथे आला. आईशी गैरकृत्य करीत असलेल्या सुमंतलाल याला बघून त्या दाेघांचा पारा चढला. बेबी व दाेनही मुलांनी सुमंतलाल याला एका खांबाला बांधले. त्यानंतर त्याला काठी आणि राॅडने जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघांनीही तेथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश काेकाटे यांच्या पथकाने त्या महिलेचा आणि तिच्या मुलाचा तांत्रिक पद्धतीने शाेध घेतला. दाेघांनाही ताब्यात घेतले असून अन्य एक अल्पवयीन मुलगा फरार झाला आहे.
Powered By Sangraha 9.0