सारस संवर्धनाचे सकारात्मक परिणाम

सारस पक्ष्यांची संख्या 12 वरून 39 वर

    दिनांक :16-Jun-2025
Total Views |
गोंदिया वनपरिक्षेत्रात 36 सारसांची नोंद
 
 
रवींद्र तुरकर
गोंदिया,
Stork bird सारस पक्ष्यांची घटती संख्या चिंतेचा विषय झाला असताना उच्च न्यायालयाच्या फटकारीनंतर या पक्षांच्या संवर्धन व संरक्षणासाठी शासन, वनविभाग व सेवाभावी संस्थांनी पुढकार घेतला. गत काही वर्षांपासून त्यांच्या सहकार्याने सारस पक्षी गणना केली जाते. सारस संवर्धन व उपाय योजनांचे सकारात्मक परिणाम पहायला मिळाले आहे. सोमवार 16 जून रोजी जिल्हयातील निश्चित क्षेत्रात सारस पक्षी गणना करण्यात आली. दोन वर्षापुर्वी 12 वर आलेली सारस पक्षी संख्या 39 वर गेली आहे. उल्लेखनिय म्हणजे गोंदिया वनपरिक्षेत्रात 36 सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली तर आमगाव क्षेत्रात 3 सारस पक्षी नोंदले गेले.
 
 
Stork bird
 
प्रेमाचे प्रतिक व शेतकरी मित्र असलेल्या सारस पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. गतवर्षीच्या गणनेत गोंदिया जिल्ह्यात 28 तर जवळील भंडारा जिल्ह्यात 2 सारस पक्ष्यांची नोंद झाली. व्याघ्र संवर्धन व वनोपज उत्पनावर लक्ष केंद्रित असलेल्या वनविभागाचे सारस पक्षाकडे दुर्लक्ष होण्याची ओरड होते. Stork bird सारसांच्या घटत्या संख्येवर सारसप्रेमींनी चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दखल केली. यावर न्यायालयाने सरकारला जाब विचारला होता. यानंतर सरकारी व सेवाभावी यंत्रणा कामाला लागल्या. सारस पक्षी आणि त्यांचा अधिवास वाचविण्यासाठी उपाय योजना सुरु झाल्या. गत दोन वर्षात त्याचे सकारात्मक परिणाम पहावयास मिळाले. गोंदियात वन विभाग, सेवा संस्था, शेतकरी व सारस प्रेमी यांच्या समन्वयातून सारस संवर्धन, संरक्षण एक चळवळ झाली. परिणाम स्वरुप दोन वर्षापूर्वी 12 वर आलेली सारस संख्या गतवर्षी 28 तर आज झालेल्या गणनेत 39 वर पोहचली आहे.
 
 
या ठिकाणी नोंदले गेले सारस
आज झालेल्या सारस गणनेसाठी सारसांचे अधिवास असलेली 36 ठिकाण निश्चित करण्यात आले होते. पैकी तेढवा मरारटोला घाट, किन्हीं घाट, डांगोर्ली घाट, शिव मंदिर कोका, कडाकणा घाट प्रत्येकी 2, दासगाव शिवार 6, छिपीया तलाव परिसर 4, बाघ नदी सतोना परिसर 8, देवरी नदी घाट व धापेवाडा पंपगृह परिसर प्रत्येकी 1, बनाथर कोचेवाही घाट व खळबंधा तलाव परिसरात प्रत्येकी 3 तर आमगाच वनपरिक्षेत्रातील घाटटेमणी परिसरात 3 अशा 39 सारस पक्षांची नोंद करण्यात आली.
 
 
प्रेमाचे प्रतीक, शेतकरी व धार्मिक महत्व असलेल्या सारसांची घटती संख्या निश्चितच चिंतेचा विषय आहे. आता शासनाच्या पुढकाराने वन विभाग, सेवाभावी संस्था, शेतकरी, सारस मित्रांनी सारस संवर्धन व संरक्षणासाठी पुढकार घेतला आहे. Stork bird प्रतिकुल परिस्थितही चांगले परिणाम दिसू लागले आहे, दोन वर्षापूर्वी गोंदिया क्षेत्रात 9 वर आलेली संख्या आता 36 वर पोहचली आहे. हे सर्व वरीष्ठ वनाधिकारी, कर्मचरी, सेवा संस्था, शेतकरी आणि सारस मित्रांच्या सहकार्याने शक्य झाले आहे.
 
-दिलीप कौशिक
वनरिक्षेत्राधिकारी (प्रा.) गोंदिया