विधानभवनाच्या इमारतीसाठी मुद्रणालयाची जागा मिळणार

16 Jun 2025 12:37:52
नागपूर,
Nagpur Vidhan Bhavan विधानभवन विस्तारीकरणाच्या अंतर्गत विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजासाठी ग्रंथालयाची ९ हजार ६७० चौ.मी. जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित केली आहे. त्या बदल्यात मुद्रणालयाला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेवरच शासनाकडून पुनर्विकास करून दिल्या जाणार आहे.
 
 
Nagpur Vidhan Bhavan
 
शासकीय आणि पुरवठा विभाग यांच्यामध्ये गत काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता संपुष्टात आला आहे.हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनात ५०० आसन क्षमतेचे विधानभवन उभारले जाणार आहे. तसेच विधीमंडळ अधिकारी व विधानभवनाच्या कामकाजासाठी शासकीय मुद्रणालयाच्या जागेचा उपयोग केल्या जाणार आहे. उद्योग विभागाच्या अखत्यारित येणार्‍या मुद्रणालयाच्या १६ हजार १८२ चौ.मी. जागेपैकी ९६७० चौ.मी. विधानभवनाला देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
विधानपरिषद Nagpur Vidhan Bhavan  सभापती राम शिंदे यांनी २१ एप्रिल रोजी प्रत्यक्ष विधानभवन येथे आढावा बैठक घेतली होती. तसेच जागेची पाहणी सुध्दा केली होती. विधानसभा सभापती अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुंबईत पुन्हा बैठक घेण्यात आली. अखेर १३ जून २०२५ रोजी उद्योग विभागाने त्यांच्या अखत्यारित असलेली ९६७० चौ. मी. जागा विधानभवनाच्या कामकाजासाठी हस्तांतरित करण्यास परवानगी दिली आहे.मुद्रणालयाने विधानभवनासाठी जागा दिल्यावर आता त्यांना जागेऐवजी त्याच जागेवर अद्ययावत आणि सर्व सुविधायुक्त अशी इमारत बांधून देण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0