लेफ्टिनंट डॉ. सौम्य असाटींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    दिनांक :16-Jun-2025
Total Views |
आमगाव,
Dr. Soumya Satish Asati वर्षभरापूर्वी भारतीय नौदलात रुजू झालेले येथील डॉ. सौम्य असाटी यांचे विशाखापट्टनम् येथे १४ जून रोजी अपघाती निधन झाले. आज १६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी, लोकप्रतिनिधी व आप्तस्वकीय व मित्रमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
 
Dr. Soumya Satish Asati
 
शहरातील डॉ. सौम्य सतीश असाटी यांनी बालपणापासूनच भारतीय सेनेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगले होते. इयता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी नीट परीक्षेतही देशात १८५२ वा स्थान प्राप्त केले होते. भारतीय सेनेच्या पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयातून सौम्य यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. यानंतर गतवर्षी ते विशाखापट्टणम् येथे नौदलात सर्जन सबलेफ्टिनंट नेवी ऑफिसर म्हणून रूजू झाले. शनिवार, १४ जून रोजी सौम्य व त्यांची मैत्रिण मेघा रावत हे दुचाकीने जात असताना हॉर्बर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील विझाग सिटीजवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात डॉ. सौम्य व डॉ. मेघा यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आमगावसह जिल्ह्यात शोककळा पसरली. आज दुपारी डॉ. सौम्य यांचे पार्थिव शहरातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आप्तस्वकीय, मित्रमंडळी व नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर स्थानिक स्मशानभूमित त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.