सामान वाचविण्याच्या नादात गमावला स्वतःचा जीव

- बाहेर पळण्याऐवजी सामान वाचविण्यासाठी थांबला दुकानात

    दिनांक :16-Jun-2025
Total Views |
नागपूर, 
Mahal Jaikamal Complex महालमधील जयकमल काॅम्प्लेक्समधील फॅन्सी फटाके आणि ईलेक्ट्रिकल्स लाईट्सच्या गाेदामाचा मालक गिरीश खत्री (34) हा दरवाज्याजवळ सामान व्यवस्थित लावत असताना गाेदामाला आग लागली. गिरीश याने दुकानाबाहेर पळ न काढता सामान वाचविण्यासाठी दुकानाच्या आत गेला. आग विझविण्याच्या नादात स्वतःसह प्रतिक ईश्वर धाेटे (25) याचाही जीव गमावून बसला, अशी धक्कादायक माहिती चाैकशीतून समाेर आली आहे. या घटनेत गुणवंत नागपूरकर (35) हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
 
Mahal Jaikamal Complex
 
महालगेटसमाेर जयकमल काॅम्प्लेक्समध्ये तिसèया माळ्यावर गिरीश खत्री हा कुटुंबियांसह राहत हाेता. त्याचे पहिल्या माळ्यावर ‘आरके लाईट हाऊन’ नावाने गाेदाम आहे. येथे लग्नात लागणारे फॅन्सी फटाके, चायनिज लाईट्सच्या माळा, सजावटीचे सामान आणि फायर शाे फटाक्याचे गाेदाम आहे. दुकानात फटाके ठेवण्यासाठी रॅक बनविण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरु हाेते. गुणवंत नागपूरकर प्रतिक धाेटे हे दाेघेही दुकानात वेल्डिंग करीत हाेते. वेल्डिंगच्या ठिगण्यांमुळे खाली ठेवलेल्या फॅन्सी फटाक्याच्या डब्याला लाग लागली. बाहेरच्या दरवाजाजवळ सामान नीट करीत असलेला गाेदाम मालक गिरीश बाहेर पळण्याऐवजी दुकानात आला. त्याने दाेनही मजुरांना आग विझविण्यासाठी प्रवृत्त केले. Mahal Jaikamal Complex स्वतः दुकानातील फटाक्याचे डबे बाहेरच्या खाेलीत न्यायला लागला. आगेची तिव्रता वाढल्यानंतर गुणवंत याने लगेच आग विझविण्याचे काम साेडून देऊन बाहेर पळ काढला. मात्र, गिरीष हा काही सामान आगेतून वाचेल या आशेने आतमध्येच थांबला. मात्र, दुर्दैवाने फटाक्याच्या आगे राैद्र रुप धारण केले आणि त्यात गाेदाम मालक गिरीश आणि प्रतिक धाेटे या दाेघांचा हाेरपळून मृत्यू झाला. जर गिरीश खत्रीने काही सामान वाचविण्याचा नाद साेडला असता तर किमान गिरीषचा जीव वाचला असता, अशी माहिती चाैकशीतून समाेर आली आहे.
नाेटिसीनंतरही सुरु हाेते गाेदाम
गिरीश खत्री यांनी पहिल्या माळ्यावरील घरात बदल करुन गाेदाम तयार केल्याची तक्रार शेजाऱ्यांनी महापालिकेत केली हाेती. त्यामुळे मनपाने खत्री यांना गेल्या काही दिवसांपूर्वीच नाेटिस बजावून 10 हजार रुपयांचा दंड ठाेठावला हाेता. तसेच रहिवाशी फफ्लॅटचा वापर गाेदाम म्हणून करण्यास मनाई केली हाेती. Mahal Jaikamal Complex तरीही गिरीश यांनी गाेदाम खाली न करता महापालिकेच्या नाेटिसकडे दुर्लक्ष केले हाेते. जर महापालिकेने कठाेर कारवाई केली असती तर ही घटना टळली असती, अशी चर्चा आहे.
रहिवाशी आणि शेजाऱ्यांमध्ये राेष
गिरीश खत्री यांना इमारतीमधील रहिवाशांनी यापूर्वी अनेकदा गाेदामातील फटाक्यांबाबत तक्रार केली हाेती. मात्र, गिरीश हा त्यांच्याशी वाद घालत हाेता. गिरीशच्या गाेदामात थीनरच्या डबक्यासुद्धा माेठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आग लागण्याची शक्यता अनेकदा शेजाèयांनी बाेलून दाखवली हाेती. या घटनेनंतर इमारतीमधील नागरिकांमध्ये राेष आहे.
रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा
गिरीश खत्री आणि डाॅ. स्वाती बजाज यांचे गेल्या तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला हाेता. डाॅ. स्वाती या भीमचाैकात क्लिनिक चालवून रुग्णसेवा करतात. गणशाेत्सवात गिरीश यांचा व्यवसायाला गती येते. Mahal Jaikamal Complex वर्षभरातील व्यवसाय गणेशाेत्सवादरम्यान हाेताे. दाेघांनीही दिवाळीनंतर अनेक स्वप्ने रंगवली हाेती. मात्र, अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या अनेक स्वप्नांचा चुराडा झाला.
... तर वाचला असता जीव
फटाके आणि थीनर नावाचे केमिकल ठेवलेल्या गाेदामात एकही फायर इंस्टिग्युशर नव्हते. अन्यथा ठिगण्यांमुळे आग लागल्यानंतर फायर इंस्टिग्युशरमधील केमिकलचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवू शकले असते. फायर इंस्टिग्युशर असते तर दाेघांचाही जीव वाचला असता.
..........