नागपूर,
Mrinmayi Kanetkar मृण्मयी प्रशांत कानेटकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत विषय वाणिज्य विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनात त्यांनी ‘इव्हॅल्यूशन ऑफ रिटेल इन्व्हेस्टर्स बिहेवियर टुवर्ड्स क्रिप्टो करन्सी विथ स्पेशन रेफरन्स टू नागपूर सिटी’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांनी सी.पी. अँड बेरार कॉलेजमधून हे संशोधन केले आहे. यशाचे श्रेेय त्यांनी मार्गदर्शक, संशोधन केंद्र, परिवाराला दिले आहे.