पराग मगर,
नागपूर,
Ranjan Darvekar : दारव्हेकर मास्तर दहावीत असताना परीक्षेच्या वेळी प्रचंड आजारी पडले. त्यामुळे लेखनीकाच्या मदतीने त्यांनी परीक्षा दिली आणि ते गुणवत्ता यादीत आले हाेते. ही आनंदी वार्ता नााशिकला असलेल्या वडिलांना त्यांनी पत्राद्वारे कळविली. वडील त्यांना पंडितजी म्हणायचे. वडील पत्रात म्हणाले, पंडितजी तुमचे पत्र मिळाले. वाचून दाखवायला कधी येता.’? कारण त्या पत्रातील एकही शब्द त्यांना कळला नव्हता. पण पुढे याच मास्तरांच्या सुरेख अक्षरातील हस्तलिखिते या नाट्यसंहिता लेखनाचा वस्तुपाठ ठरल्या.

दारव्हेकर मास्तरांच्या जन्मशताब्दी वर्षारंभाचे औचित्य साधून 1 जून राेजी मास्तरांच्या जन्मदिनी विदर्भ साहित्य संघात आयाेजित अभिवादन कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक महेश एलकुंचवार यांनी मास्तरांच्या हस्तलिखित संहितांचे वैशिष्ट्य कथन करताना संहितांलेखनावर सखाेल संशाेधनाची गरज व्यक्त केली. मास्तरांच्या सुरेख अक्षरांवर ते भरभरून बाेलते. पण हेच सुरेख अक्षर आधी वाचताही येणार नाही असे गचाळ हाेते. वडिलांच्या एका वाक्याचा त्यांच्यावर, असा काही परिणाम झाला की याच मास्तरांचे अक्षर पुढे महाराष्ट्रात माेत्यासारखे सुंदर या उपाधीने गाैरविल्या गेल्याची आठवण त्यांचे सुपत्र रंजन दारव्हेकर यांनी तरुण भारतला सांगितली.
दारव्हेकर मास्तरांनी 11 नाटके, काही एकांकिकांसह दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी जवळपास 700 श्रृतिका लिहिल्या. त्यांंची हस्तलिखिते वाचणे हा आनंद देणारा अनुभव हाेता. मास्तर आकाशवाणीत कार्यरत असताना कार्यक्रम सादर करणाèयांना सूचना व पत्रेही ते अशाच सुरेख हस्ताक्षरात लिहायचे. विशेष म्हणजे मुंबईत गेल्यावर सुरुवातीला त्यांनी नेमप्लेट व पत्रिका लिहिण्याची कामे करूनच आपली गुजरान केली. त्या पाट्या मी मुंबईला जाऊन पाहून आल्याचे रंजन दारव्हेकर सांगतात.
25 जणांचा ताा घेऊन पणशीकर तालमासाठी नागपुरात
हात कायम लिहिता असतानाही मास्तर नेहमी म्हणायचे, मी लेखक नाही तर दिग्दर्शक आहे. आज नागपुरात चांगली नाटके येत नसल्याची ओरड कायम हाेते. पण मास्तरांच्या दिग्दर्शनात हाेत असलेले वसंत कानिटकर लिखित ‘मला काही सांगायचय’ या नाटकाच्या तालमीसाठी दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर स्वतः 25 जणांचा ताा घेऊन नागपुरात आले हाेते, अशी आठवण रंजन दारव्हेकर यांनी सांगितली.