पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून

मसलीतील थरारक घटना

    दिनांक :16-Jun-2025
Total Views |
नागपूर, 
Nagpur News दारुडा पती प्रेमसंबंधात आडकाठी टाकत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला. ही थरारक घटना आज रविवारी काटाेल पाेलिस ठाण्याच्या अंतर्गत मसली गावात घडली. याेगेश अमृत घाटे (वय 40 वर्ष रा. मसली) असे मृत पतीचे नाव आहे. तर पत्नी राणी घाटे (30) आणि प्रियकर अनिल दिगांबर तागडे (वय 35 वर्ष, रा. मसली) अशी आराेपींची नावे आहेत.
 
Nagpur News
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याेगेश घाटे हा राजेंद्र सूर्यभानजी ठाकरे (रा. काटाेल) यांच्याकडे शेतावर सालगडी म्हणून काम करताे. ताे पत्नी राणीसह राहत हाेता. राजेंद्रला दारुचे व्यसन हाेते, त्याच कारणावरुन पती-पत्नीत नेहमी खटके उडत हाेते. राणी एका नर्सरीवर झाडांना पाणी देण्याच्या कामावर जात हाेती. दरम्यान, दाेन वर्षांपूर्वी तिची गावातील युवक अनिल तागडे याच्याशी ओळख झाली. काही दिवसांत दाेघांची मैत्री झाली. अनेकदा पती दारु पिऊन मारहाण करीत असल्यामुळे राणी ही अनिलला मदत करायला बाेलवत हाेती. यादरम्यान, दाेघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याेगेश हा कामावर गेल्यानंतर अनिल हा राणीला भेटायला घरी येत हाेता. दाेघांच्या प्रेमसंबंधाची गावात चर्चा हाेती. Nagpur News काही दिवसांपूर्वी, अनिल आणि राणी हे दाेघेही एकमेकांशी बाेलताना याेगेशला दिसले. त्यामुळे त्याने दाेघांच्या प्रेमसंबंधावरुन राणीला मारहाण केली. मात्र, राणीने प्रेमसंबंध असल्याबाबत नकार दिला. याेगेश हा दारु पिऊन आल्यानंतर अनिलशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरुन वारंवार पत्नीला मारहाण करीत हाेता.
असा केला खून
शुक्रवारी दुपारी याेगेश हा दारु पिऊन घरी आला. त्याने राणीला अनिलशी असलेल्या प्रेमसंबंधावरुन मारहाण केली. त्यामुळे राणीने प्रियकराला फोन करुन घरी बाेलावले. दारुच्या नशेत असलेल्या याेगेशचा काटा काढण्याचे कट रचला. राणीने त्याचे पाय दाेरीने बांधले तर अनिलने याेगेशचा गळा आवळून खून केला.
अशी उघडकीस आली घटना
शेतमालक राजेंद्र ठाकरे हा सालगडी याेगेशला कामावर नेण्यासाठी घरी आला. त्यावेळी राणीने पती घरी नसल्याचे सांगितले. मात्र, ठाकरे यांंना घरात तिचा प्रियकर संशयास्पद स्थितीत दिसला. Nagpur News ठाकरे यांनी काटाेल पाेलिस ठाण्यात माहिती दिली. पाेलिस कर्मचारी घरी आले असता घरात याेगेश दिसून आला नाही. घराच्या मागे शाेध घेतला असता याेगेशचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन राणी व तिची प्रियकर अनिल तागडे यांना अटक केली. न्यायालयाने तीन दिवस पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.