नागपूर,
nagpur medical college नॅशनल मेडिकल कौंसिलने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नियमावली (पीजीएमईआर) 2023 मध्ये एक महत्त्वाची सुधारणा प्रस्तावित केली आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विभागप्रमुखाचा (एचओडी) कार्यकाळ तीन वर्षांनी रोटेशनल पद्धतीने बदलण्याचेे सूचविण्यात आले आहे. त्यानुसार, आता प्रत्येक विभागाचे प्रमुख पद दर तीन वर्षांनी प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक असे बदलेल. यासाठी 29 जूनपर्यंत अभिप्राय मागवण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मेडिकलमध्ये सुमारे 25 विभाग आहेत. रोटेशन पद्धत लागू केली तर दर तीन वर्षांनी किमान 8 विभागांचे एचओडी बदलत राहतील. एचओडी बदलल्याने नवीन सहयोगी प्राध्यापकांना संधी मिळेल. नवीन एचओडींसोबत काम करण्याची संधी मिळेल.
हा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही. देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रमुख अधिकाèयांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या विषयाबाबत, मार्डचे राज्य सरचिटणीस डॉ. सजल बन्सल म्हणाले की, याचा नकारात्मक परिणाम होईल. एचओडी तीन वर्षांसाठी आले तर त्यांना वाटेल की मला तीनच वर्षे रहायचे आहे. नंतर मला दुसरीकडे कुठेतरी जावे लागेल. अशा मानसिकतेमुळे ते विभागाच्या विकासाकडे, आवश्यक संसाधनांकडे किंवा इतर महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करू शकतात. यामुळे विभाग कमकुवत होऊ शकतो.