नागरिकांच्या सर्व समस्या जिल्ह्यातच सोडविल्या जाणार

17 Jun 2025 11:51:19
नागपूर,
Akash Fundkar राज्यातील जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, भाजपचे सर्व मंत्री राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील भाजप पदाधिकार्‍यांसोबत बैठका घेतील. नागरिकांच्या सर्व समस्या या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना आता मुंबईत मंत्रालयात जाण्याची गरज राहणार नाही. सरकारचे सर्व अधिकारी आणि मंत्री त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध असतील, असे स्पष्ट प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले. गणेशपेठ येथील भाजप कार्यालयात जनसंवाद कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक घेण्यात आली.
 

jansamprak BJP 
 
यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी महापौर व भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी आमदार अशोक मानकर, सुधीर देऊळगावकर, गुड्डू त्रिवेदी, भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, मनोहर कुंभारे, माजी आमदार विकास कुंभारे,डॉ. राजू पोतदार, अश्विनी जिचकार, शिवानी दाणी, आमदार कृष्णा खोपडे, राम अांबुलकर, बाल्या बोरकर, विष्णू चांगदे, चेतन कायरकर, प्रगती पाटील, चंदन गोस्वामी आदी उपस्थित आकाश फुंडकर पुढे म्हणाले, नागरिकांच्या विविध समस्या असतात. सरकार आपल्या दारी या अंतर्गत नागरिकांच्या समस्या प्रत्येक जिल्हयात सोडवल्या जातील. त्यामुळे मुंबईत जाण्या- येण्याचा खर्च वाचणार आहे. नागरिकांचे प्रश्न सरकारचे सर्व अधिकारी आणि मंत्री त्यांच्याच जिल्ह्यात ऐकतील.

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, सरकार दारी सारख्या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. जिल्हा प्रशासनाने ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम सुरू केला आहे. अनेक शासकीय योजना, उपक्रम, प्रमाणपत्र थेट जनतेच्या हातात एका क्लिकवर आणले आहेत. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही वेगाने सुरु केले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या कार्यशैलीचा करताना दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, संघटना मजबूत करण्यासाठी भाऊसाहेबांनी खुप परिश्रम घेतले होते. आता आकाश फुंडकर कामगार मंत्री असल्याने त्यांच्या हातून कामगारांची सेवा होत आहे.
 
कार्यकर्त्यांच्या सेवाभावी वृत्तीवर भाजप उभी
आनंदराव राऊत म्हणाले, भाजपची व्होट बँक केवळ राजकारणावर नाही, तर कार्यकर्त्यांच्या सेवाभावी वृत्तीवर उभी आहे.Akash Fundkar नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन दारी अत्यंत मोलाची ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळविण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे.

भाजप शासनाने करुन दाखविले
मनोहर कुंभारे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, मंत्रालयातील कामे गावात होत असतील तर नागरिकांचा पैसा वाचणार आहे. प्रशासनाच्या कार्यशैलीला गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने करुन दाखविले आहे. भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या बळामुळेच आज पक्षाची ताकत दिवसेंदिवस वाढत आहे. जनसंवाद कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0