"या" बड्या अभिनेत्याच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा

अनेक प्रकार समोर येणार?

    दिनांक :18-Jun-2025
Total Views |
चेन्नई,
Arya Chennai लोकप्रिय तमिळ अभिनेता आर्यच्या निवासस्थानं आणि त्याच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सवर बुधवारी सकाळी आयकर विभागाने छापे टाकले. आर्यने अरिंथम अरियामलम, बॉस एंगिरा भास्करन आणि राजा राणी यांसारख्या चित्रपटांतून मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तो एका आंतरराष्ट्रीय फूड चेनशी संबंधित करचुकवेगिरी प्रकरणात चौकशीत अडकला आहे.
 
 
 
Arya Chennai
आयकर विभागाने चेन्नईतील अण्णा नगर, वेलाचेरी आणि दुरईपक्कम येथील सी शेल या त्याच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनच्या विविध शाखांवर धाड टाकली. आर्यचे रेस्टॉरंट अरबी खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते आणि त्याच्या अनेक शाखा चेन्नईसह तामिळनाडू व केरळमध्ये आहेत.
 
 
 
सूत्रांनी दिलेल्या Arya Chennai माहितीनुसार, दुबईत मुख्यालय असलेल्या एका कंपनीच्या गुंतवणुकीत करचुकवेगिरी झाल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने कोचीतील एका प्रकरणाशी संबंधित चौकशी दरम्यान या रेस्टॉरंट चेनवर लक्ष केंद्रीत केले होते. दुबईतील कंपनीकडून रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गुंतवणुकीत आयकर नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय आहे.बुधवारी सकाळी आयकर विभागाचे अधिकारी तीन वाहनांमधून अण्णा नगर येथील सी शेल रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली. त्याचवेळी वेलाचेरी आणि दुरईपक्कम येथील शाखांवरही छापे टाकण्यात आले. आयकर विभागाचे पथक रेस्टॉरंट मालकांच्या घरांचीही झडती घेत आहे. तपासासाठी आठ पथकांमध्ये विभागणी करून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू आहे.
 
 
 
दरम्यान,Arya Chennai  आयकर विभागाने अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नाही. तपास पूर्ण झाल्यावरच छाप्यात काय आढळले आणि करचुकवेगिरीचे आरोप कितपत खरे आहेत, हे स्पष्ट होणार आहे.