आदर्श शालेय शिक्षणाचा सर्वोत्कृष्ट सावनेर पॅटर्न तयार करू

आ. डॉ. आशीष देशमुख यांचे प्रतिपादन

    दिनांक :18-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Ashish Deshmukh अतिशय वेगाने बदलणाèया आधुनिक शिक्षण प्रणालीत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षण व्यवस्थेत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांचा दर्जा विद्यार्थी हित केंद्रित करून उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना तयार करा व राबवा, असे निर्देश आ. डॉ. आशीष देशमुख यांनी दिला.
 
 
सावनेर तालुक्यातील खापा येथे आयोजित सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संचालित शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासंदर्भात खापा येथील राधाकृष्ण हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श शालेय शिक्षण प्रणालीचा महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट असा सावनेर पॅटर्न तयार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्तकेला.
 
 

Dr. Ashish Deshmukh 
 
 
माझी माऊली फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आयुश्री आशीष देशमुख यांचे ‘मॉडेल स्कूल’चे पीपीटी सादरीकरण, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. खापा नगर परिषदेच्या सर्व शाळांमधील ‘माझी माऊली फाऊंडेशनच्या ‘आदर्श शाळा अभियान’अंतर्गत केलेल्या विकास कार्यांसोबतच, सर्व शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची एक विस्तृत रूपरेषा अतिशय मार्मीकपणे सादर केली.
 
 


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी विशेष बैठक
शाळेतील भौतिक सोयी-सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, नैतिक मूल्यसंवर्धन, खेळ संस्कृती, सामाजिक सहभागिता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय पोषण, विद्यार्थी आरोग्य व स्वच्छता इत्यादी विषयांवर वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना फक्त शिक्षित नव्हे तर योग्य, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनवून शिक्षणातून समाजोन्नतीचे उद्दिष्ट साध्य करावं, असे विचार डॉ. आयुश्री देशमुख यांनी व्यक्तकेले.
 
 
क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे आ. डॉ. आशीष देशमुख यांनी जि. प. व न.प. शाळांमधील व्यवस्था दर्जेदार करण्यासंदर्भात लक्ष केंद्रित केल्याने खाप्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमास जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उपजिल्हाधिकारी प्रवीण माहिरे, नगर पालिका सह आयुक्त विनोद जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, अरविंद इण्डो पब्लिक स्कूल अमरावतीच्या मुख्याध्यापिका विजया बागदेव, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, सावनेरच्या मुख्याधिकारी बगडे, खापा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी धनंजय सरनाईक, कळमेश्व नगर परिषदेचे आकाश सुरडकर तसेच दोन्ही तालुक्यातील गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, केन्द्र प्रमुख व सर्व मुख्याध्यापक, खाप्यातील प्रफुल्ल मोहटे, खेमराज बारापात्रे, अमोल भुते, पीयूष बुरडे, राजेंद्र बुरडे, पवन पैठणकर उपस्थित होते.केंद्र प्रमुख वाहाणे, नेहारे, मेश्रााम, खडसे, मोंडे व इतर शिक्षकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.