राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत क्रांतिकारी निर्णय!

शेती, शिक्षण, नागरी सुविधा आणि सामाजिक कल्याण क्षेत्राला गती

    दिनांक :18-Jun-2025
Total Views |
मुंबई,
MahaAgri-AI Policy 2025-2029 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेती, शिक्षण, नागरी सुविधा आणि सामाजिक कल्याण क्षेत्रासाठी महत्त्वाचे आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. एकूण दहा निर्णयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळणार आहे.
 
 

MahaAgri-AI Policy 2025-2029 

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; हवामान केंद्रांची उभारणी
राज्यातील MahaAgri-AI Policy 2025-2029 कृषी क्षेत्रासाठी ‘महाॲग्री-AI धोरण 2025-2029’ मंजूर करण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ड्रोन, रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत आमूलाग्र बदल घडवला जाणार आहे. महा-अ‍ॅग्रीस्टॅक, डिजिटल शेतीशाळा आणि क्रॉपसॅप सारखे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवले जाणार आहेत. तसेच WINDS प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) उभारली जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामान आधारित सल्ला मिळणार आहे.