'सोनम की बेवफाई' पुन्हा चर्चेत

गाजलेली घटना आणि चित्रपटाची आठवण

    दिनांक :18-Jun-2025
Total Views |
मुंबई,
Sonam Guptra Bewafa movie मेरठची हत्या करणारी पत्नी मुस्कान प्रकरण कोणीही विसरू शकलेले नाही. त्याच धर्तीवर आता इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी आणि त्याच्या पत्नी सोनमच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. राजाने मे महिन्यात सोनमशी लग्न केले होते. हनिमूनसाठी मेघालयला गेलेले हे नवविवाहित जोडपे २३ मे रोजी बेपत्ता झाले. त्यानंतर जंगलात राजाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, अलीकडेच सोनमला गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे.
 
 
 

Sonam Guptra Bewafa movie 
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाआधी सोनमचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिने त्याच्यासह पतीची हत्या केली, अशी संशयाची सुई फिरते आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा 'बेवफाई'वर वादविवाद सुरू झाले आहेत.विशेष म्हणजे, सोनमच्या बेवफाईसंदर्भात लोकांना २०२१ मध्ये आलेल्या एका चित्रपटाची आठवण झाली आहे. हा चित्रपट आहे 'क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है'.
 
 
 
'क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है' कधी प्रदर्शित झाला आणि काय आहे कथा?
हा चित्रपट Sonam Guptra Bewafa movie  २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात पंजाबी गायक-अभिनेता जस्सी गिल आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती प्रमुख भूमिकेत होते. सुरभीने यात सोनम गुप्ता ही भूमिका साकारली आहे. चित्रपटात हत्या नाही, परंतु सोनमची बेवफाई दाखवण्यात आली आहे.चित्रपटाची कथा सिंतु (जस्सी गिल) आणि सोनम गुप्ता (सुरभी ज्योती) यांच्या प्रेमकथेभोवती फिरते. सोनम सिंतुला लग्नाचे वचन देते, मात्र नंतर त्याचे पैसे घेऊन पळून जाते. पुढील कथानक विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने उलगडते.
 
 

दिग्दर्शकाला कल्पना कशी सुचली?
दिग्दर्शक सौरभ त्यागी यांना चित्रपटाची कल्पना दहा रुपयांच्या नोटेवर लिहिलेल्या 'सोनम गुप्ता बेवफा है' या वाक्यामुळे सुचली. ही नोट व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक मीम्स तयार झाले आणि त्या घटनांवरूनच या चित्रपटाची कथा तयार झाली.हा चित्रपट सध्या झी ५ आणि झी स्टुडिओच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येऊ शकतो.