ब्रह्माकुमारीतर्फे रविवारी योग दिन

    दिनांक :19-Jun-2025
Total Views |
नागपूर, 
Yoga Day : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे वर्धा मार्गावरील जामठास्थित विश्व शांती सरोवरमध्ये रविवारी 22 जूनला सकाळी 8 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्यात आला आहे.योग प्रशिक्षक डॉ. भरत गुप्ता, शोभा भागिया प्राणायामाची जाणीव करून देतील.
 
 
KM,N
 
ब्रह्माकुमारी राजयोगिनी डॉ. दामिनी दीदी अध्यात्म व संगीत यांच्यात संतुलन राखून स्वतःवर कसे उपचार करावे, याबाबत मार्गदर्शन करतील. त्या पहिल्यांदाच नागपूरला येत आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता वसंतनगरातील सेवाकेंद्रात ‘पॅरेटिंग टुल्स फॉर ब्युटीफुल बाँडिंग’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होईल. विशेष निमंत्रितांसाठी हा कार्यक्रम आहे. 23 जूनला येथेच संध्याकाळी 6 वाजता ‘डेकोरेट युवा फ्युचर’ या विषयावर तरुणांसाठी कार्यक्रम आहे. 16 ते 30 वर्षे वयोगटातील तरुणांना प्राधान्य दिले जाईल. या दोन्ही कार्यक्रमांसाठी नोंदणी मोफत व अनिवार्य आहे. मंगळवारी 24 जूनला सायंकाळी 6 वाजता ’शौर्य सुरो मे रंगा...दिल मे प्यारा तिरंगा’ हा कार्यक्रम सुरेश भट सभागृहात सायंकाळी 6 वाजता होईल.