शहरातील 4147 झाडांपैैकी केवळ 1104 झाडे झाली माेकळी
- महापालिकेकडून उच्च न्यायालयात माहिती सादर
दिनांक :19-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Cementation of 4147 trees उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला शहरातील झाडांना सिमेंट आणि डांबरीकरणाच्या फासातून मुक्त करण्याचे आदेश दिले हाेते. शहरातील 4 हजार 147 झाडांना सिमेंटीकरणाचा फास असल्याचा अहवाल प्राप्त झाला हाेता. त्यापैकी केवळ 1104 झाडांच्या भाेवती असलेला सिमेंटीकरणाचा फास मुक्त करण्यात आला. मात्र, अजुनही 3 हजार 43 झाडांच्या भाेवती सिमेंटचा फास अजुनही कायम असल्याची माहिती समाेर आली आहे. ही सर्व आकडेवारी उच्च न्यायालयात महापालिकेने सादर केली आहे.
शहरात शेकडाे झाडांच्या बुंध्यांना सिमेंटीकरण किंवा डांबराने आळे केल्यामुळे झाडांचा श्वास राेखल्या गेला हाेता. त्यामुळे शहरातील अनेक झाडे वाळायला लागली हाेती. अनेक झाडांना माेकळा श्वास घेता येत नसल्यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण झाली हाेती. या संदर्भात उच्च न्यायालयाने गेल्या दाेन महिन्यांपूर्वीच महापालिका आणि संबंधित विभागांना झाडांना सिमेंट आणि डांबरीकरणाच्या फासतून मुक्त करण्याचे आदेश दिले हाेते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2025 राेजी समिती गठीत करण्यात आली. या समितीची पहिली बैठक 15 एप्रिल राेजी घेण्यात आली हाेती. Cementation of 4147 trees नागपूर महापालिकेने चिन्हित केलेल्या शहरातील 4 हजार 147 झाडांना सिमेंट आणि डांबरीकरणाच्या फासातून मुक्त करा, असे निर्देश बिदरी यांनी दिले हाेते. या समितीचे सदस्य महापालिका आयुक्त डाॅ. अभिजित चाैधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.यांच्यासह महामेट्राे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली हाेती. मात्र, गेल्या दाेन महिन्यांत शहरातील 4 हजार 147 झाडांना सिमेंटीकरणाचा ास असल्याचा अहवाल प्राप्त झाला हाेता. त्यापैकी केवळ 1104 झाडांच्या भाेवती असलेला सिमेंटीकरणाचा फास मुक्त करण्यात आला. मात्र, अजुनही 3 हजार 43 झाडांच्या भाेवती सिमेंटचा फास अजुनही कायम असल्याची माहिती समाेर आली आहे.