मुख्याध्यापक गुंडेराव येवले यांचा सत्कार

    दिनांक :19-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Mazi Shala Sundar Shala १९३२ मध्ये स्थापित विदर्भातील ख्यातनाम शिक्षण संस्था नागपूर शिक्षणमंडळ ,नागपूर द्वारा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करिता ग्रामीण विभागासाठी देण्यात येणारा वर्ष २०२५ चा पुरस्कार, जीवन विकास विद्यालय उमरेडचे मुख्याध्यापक गुंडेराव हरिदास येवले यांना सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा व डॉक्टर आशुतोष पातुरकर यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहित शहा, उपाध्यक्ष विकास बिंझाणी, सचिव एडवोकेट राजीव देव ,श्री बिंझाणी सिटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजित मेत्रे, यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
 
 

gunde satkar  
 
 
 नागपूर शहर तथा ग्रामीण विभागातील सुमारे ९० शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता उपक्रमशील, उत्कृष्ट निकालांची परंपरा असलेली, Mazi Shala Sundar Shala  स्वच्छ व नीटनेटका शालेय परिसर असलेली प्रगतिशील शाळा, मुख्यमंत्री: माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आदर्श शिक्षकांचे मानकरी अशा विविध निकषांच्या आधारे निवड करून गुंडेराव येवले यांना उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीचा पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले .जीवन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रावण पराते, उपाध्यक्ष सुरेश झुरमुरे, सचिव प्रशांत सपाटे, सहसचिव बा. रा .बोकडेव इतर मान्यवरांनी ह्या उपलब्धीबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा नागपूर तर्फे देण्यात आलेल्या उपक्रमशील शाळा पुरस्कारा करिता येवले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.
सौजन्य: प्रणय पराते,संपर्क मित्र