धक्कादायक...साठ्ये कॉलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Sathaye-Mumbai-suicide महाविद्यालयाच्या इमारतीवरून घेतली उडी

    दिनांक :19-Jun-2025
Total Views |
मुंबई,
 
 
Sathaye-Mumbai-suicide मुंबईत एका धक्कादायक आणि दुर्दैवी घटनाक्रमात साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या (Sathaye Engineering college) तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, कुटूंबीयांनी तिला कोणीतरी ढकलल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलिसांच्या मते प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्याच आहे.
 
 
 

Sathaye-Mumbai-suicide 
 
 
 
Sathaye-Mumbai-suicide मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील (Vileparle Mumbai) नामांकीत साठ्ये महाविद्यालय आज सकाळी महाविद्यालयाच्या तिसèया माळ्यावरून उडी घेत संध्या पाठक या 21 वर्षीय युवतीने आत्महत्या केली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संध्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे. त्यानंतर साठ्ये कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली असून चर्चांना वेग आला आहे. संध्या पाठक (Sandhya Pathak) हिने आत्महत्या केली किंवा ती पडली किंवा तिला कोणी ढकललं का? याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही. विलेपार्ले पोलिस या प्रकरणी सविस्तर तपास करीत आहेत.
 
 
Sathaye-Mumbai-suicide प्राथमिक माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात, संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडॉरमधून चालताना दिसते आहे. तिने आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. मात्र, संध्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला असून, तिला कोणीतरी ढकलेले असावे, असे संध्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. महाविद्यालयानं मात्र ही आत्महत्याच असल्याचं सांगितलं आहे. आता पोलीस तपासात काय समोर येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.