प्रेक्षकांची लाडकी 'दयाबेन' लवकरच परतणार?

19 Jun 2025 13:17:53
मुंबई,
Taarak Mehta Ka Ooltah Chashma छोट्या पडद्यावरील सर्वांची आवडती आणि गेली 17 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील जेठालालची पत्नी दयाबेन ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात आजही तशीच प्रिय आहे. मात्र मागील काही वर्षांपासून दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी शोमध्ये दिसलेली नाही. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी तिच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
 
 

Taarak Mehta Ka Ooltah Chashma  
अशातच, मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या पुनरागमनावर मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, "आम्ही लवकरच दयाबेनला शोमध्ये परत आणू. दिशा वकानी पुन्हा ही भूमिका साकारेल का, हे मात्र सध्या निश्चित सांगता येणार नाही. ती परत यावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. काहीही झाले तरी आम्ही दयाबेनला परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी काम सुरू आहे."
 
 
दयाबेनच्या Taarak Mehta Ka Ooltah Chashma अनुपस्थितीचा परिणाम मालिकेच्या लोकप्रियतेवर आणि टीआरपीवर दिसून आला आहे. याबाबत बोलताना असित मोदी म्हणाले, "कधी कधी इतर चॅनेल्सकडून स्पर्धा वाढते, किंवा काही मोठ्या बातम्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेगळ्या ठिकाणी जाते. मात्र आमचे निष्ठावंत प्रेक्षक आजही सोनी लिव्ह आणि यूट्यूबवर आमच्यासोबत आहेत. त्यामुळे फारशी चिंता करण्यासारखी गोष्ट नाही."देशभरातील प्रेक्षकांना आता दयाबेनच्या पुनरागमनाची उत्सुकता लागली आहे. दिशा वकानी परतते का, किंवा दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी नवीन चेहरा दिसतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Powered By Sangraha 9.0